Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य सेवा पूर्व परीक्षेचे कॅमेऱ्यांद्वारे होणार चित्रीकरण

राज्य सेवा पूर्व परीक्षेचे कॅमेऱ्यांद्वारे होणार चित्रीकरण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उद्या (दिनांक २१) रोजी राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा (State Service Pre-examination )होणार आहे.

- Advertisement -

प्रत्येक वर्गातील कामकाजाचे सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून परीक्षेनंतर चित्रीकरण तपासण्यात येईल व आयोगाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या उमेदवार आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे. १६१ वर्ग अ आणि वर्ग ब राजपत्रित पदांकरिता ही पूर्व परीक्षा होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर आणि अधिकृत ट्विटर हँडलवर आयोगाने याबाबत स्पष्ट केले असून यामुळे चुकीच्या गोष्टींना लगाम बसणार आहे. त्यासोबतच आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता उमेदवारांची हजेरी बुबुळ ओळख पडताळणी द्वारे नोंदविण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच हजेरी नोंदविल्यानंतर थेट वर्गामध्ये जाणे बंधनकारक आहे अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल, असे देखील स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात सव्वा बारा हजार उमेदवार देणार परीक्षा

नाशिक जिल्ह्यात ही परीक्षा ३२ केंद्रांवर होत असून १२ हजार ३८० उमेदवार पूर्वपरीक्षा देणार आहेत. दोन सत्रात होत असलेल्या या परीक्षेसाठी १ हजार १४० जणांचा स्टाफ नेमण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या