Sunday, May 5, 2024
Homeजळगावबेशिस्त वाहनधारकांनाकडून बारा लाख 34 हजारांचा दंड वसूल

बेशिस्त वाहनधारकांनाकडून बारा लाख 34 हजारांचा दंड वसूल

भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal

वाहतूक शाखेच्या वतीने गेल्या 40 दिवसात 5 हजार 734 वाहन धारकांवर कार्यवाही 12 लाख 34 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केल्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दि.27 रोजी दिली.

- Advertisement -

शहरातील बेशिस्त वाहतुकीला आवळा बसवून वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शना खाली वाहतुक शाखेचे सहा.पो.नी. आराक सह सहकाऱ्यांनी बेशिस्त वाहन कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील दोन दिवसात 91 रिक्षाचालक, तीन फॅन्सी नंबर प्लेट, 25 खराब नंबर प्लेट, 176 लायसन नसलेले, 20 ट्रिपल सीट अशा 102 केसेस मधून 86 हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

17 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यानच्या या 40 दिवसांच्या धडक कारवाईत पाच हजार 734 बारा लाख 34 हजार 800 रुपयांचे दंडाची कारवाई करण्यात आली आहे परिसरात सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे वाहन धारकांमध्ये शिस्तचे चित्र दिसुन येत आहे. वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेली ही आतापर्यंतचे शहरातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या