Monday, September 7, 2026
HomeनाशिकNashik Rain Update: नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट; जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा...

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट; जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

उत्तर-पूर्व तालुके आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस; जीवित अथवा वित्तहानी नाही

नाशिक | प्रतिनिधी
भारतीय हवामान खाते (Indian Meteorological Department) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) (३१ जुलै) रोजी रेड अलर्ट (Red Alert) जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन (District Administration On Alert Mode) पूर्णपणे सतर्क असून सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी दिली आहे. जिल्ह्यातील निफाड, मनमाड, नांदगाव आणि मालेगाव या उत्तर-पूर्व भागातील तालुक्यांमध्ये तसेच इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. घाट परिसरातील मुसळधार पावसामुळे वाहणारे पाणी नाशिक शहर व दिंडोरी परिसरापर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पाटबंधारे विभागाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.

जिल्ह्यात पावसामुळे आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जीवित किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची नोंद नाही. जिल्ह्यातील सर्व रस्ते आणि वाहतूक सुरळीत सुरू आहे. पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही कुठे पिकांचे नुकसान झाल्यास महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

शालार्थ आयडी घोटाळा; ‘गरुडा’चे पंख छाटले! मुख्य सुत्रधार दीपक गरुडला अटक, मुलगा सहसंशयित

नाशिक शहर परिसरात सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, ३१ जुलै रोजी दुपारपासून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन केले आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके प्रत्यक्ष मैदानावर तैनात असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

हवामान खात्याच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी बाळगावी. जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणा परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.”
– आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, नाशिक)

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सत्तर वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांसमोर आरोपी...

0
वणी | वार्ताहर | Vani दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) लखमापूर येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद परिस्थितीत खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...