Saturday, August 1, 2026
Homeक्राईमशालार्थ आयडी घोटाळा; 'गरुडा'चे पंख छाटले! मुख्य सुत्रधार दीपक गरुडला अटक, मुलगा...

शालार्थ आयडी घोटाळा; ‘गरुडा’चे पंख छाटले! मुख्य सुत्रधार दीपक गरुडला अटक, मुलगा सहसंशयित

नाशिक | प्रतिनिधी
बनावट शालार्थ आदेशांच्या (Shalarth ID Scam) आधारे शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Scam) केल्याप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखेने (Nashik Crime Branch) आता मुख्य सूत्रधार दीपक काशीनाथराव गरुडला (Dipak Garud Arrested) अटक करून त्याच्या मुलाला आणि इतर दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. शिरपूर (जि. धुळे) येथील बिजासन घाटातून (Bijasan Ghat) या चौघांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, दीपक गरुड याला पळून जाण्यास आणि पोलिसांची अटक टाळण्यास मदत केल्याप्रकरणी त्याचा १८ वर्षीय मुलगा राज वीर दीपक गरुड यालाही या गुन्ह्यात पोलिसांनी सहसंशयित केले आहे.

नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार विभागातील तब्बल १८४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैयक्तिक मान्यता व शालार्थ प्रस्ताव नसताना मागच्या तारखेच्या बनावट नियुक्त्या दाखविण्यात आल्या होत्या. याआधारे शालार्थ प्रणालीत बोगस ड्राफ्ट भरून वेतन व थकबाकी लाटत शासनाला १६० कोटींचा गंडा घातला गेला. या घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे १२०० संशयित निष्पन्न झाले आहेत.

- Advertisement -

संशयित दीपक काशीनाथराव गरुड (५२, रा. पारसनगर, शेंदुर्णी, जि. जळगाव) हा एका शालेय संस्थेचा सहसचिव आहे. त्याने इतर संशयितांसह मिळून १५ संस्थांमधील १७७ कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आदेश तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांकडून बनवून घेतले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक गरुड पसार झाला होता. मात्र, त्याचा मुलगा राजवीर (१८) याने दीपक याला पोलिसांपासून लपवण्यासाठी आसरा दिला आणि अटक टाळण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. त्यामुळे गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई करत राजवीर गुन्ह्यात सहसंशयित करून कारवाई केली आहे.

Chhagan Bhujbal: नाशिकमध्ये हे काय सुरु आहे? शहरातील खड्ड्यांवरुन छगन भुजबळांचा संताप, म्हणाले, असंतोषाची…

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त तथा एसआयटीप्रमुख संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळ-के आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

बिजासन घाटात रचला सापळा
गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या शोधात असताना धुळ्यातील शिरपूर येथील बिजासन घाटात ते लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकून मुलगा राजवीर गरुड आणि त्यांचे साथीदार सोपान सुपुडू बारी (५२, रा. शेंदुर्णी, जळगाव) व पंकज माधवराव चव्हाण (४२, रा. रांजणगाव, चाळीसगाव) अशा तिघांना ताब्यात घेतले. प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेचे कलम २४९ वाढवले असून, न्यायालयाने दीपक गरुड याला तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतरांना नोटीस बजावली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दिवसा इलेक्ट्रीशियन, रात्री मारायचे डल्ला; ५ लाखांच्या...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati दिवसा ठिकठिकाणी इलेक्ट्रीशियन म्हणून काम करायचे आणि रात्रीच्या वेळी इमारतींमधून लाखो रुपयांची कन्सील कॉपर वायर लांबवायची, अशा भामट्यांच्या टोळीचा आडगाव...