Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशDelhi New CM Oath : दिल्लीत पुन्हा 'महिलाराज'; रेखा गुप्ता यांनी घेतली...

Delhi New CM Oath : दिल्लीत पुन्हा ‘महिलाराज’; रेखा गुप्ता यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकीत (Delhi Vidhansabha Election) भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकत आम आदमी पक्षाला पराभूत केले. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासूनची दिल्लीतील ‘आप’ची (AAP) सत्ता संपुष्टात आणली. त्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. यानंतर काल (बुधवारी) भाजपच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत रेखा गुप्ता यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली.

- Advertisement -

त्यानंतर आज रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची तर परवेश शर्मा (Parvesh Sharma) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार घेतली. यानंतर अनुक्रमे आशिष सूद, मनजिंदर सिरसा, रविंदर इंद्रज सिंह, पंकज सिंह आणि कपिल मिश्रा यांनी मंत्रि‍पदाची (Ministership) शपथ (Oath) घेतली.

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह एनडीएमधील सहकारी पक्षाचे प्रमुख नेते आणि केंद्रातील मंत्री उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी हजर होते.

रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास

रेखा गुप्ता या संघविचारक आणि प्रचारक राहिल्या असून विद्यार्थी संघटनेपासून त्या भाजपत कार्यरत आहेत. सन १९९४-९५ ला दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, १९९५-९६ मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव राहिल्या असून १९९६-९७ मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्ष, सन २००३-२००४ ला भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव, २००४-२००६ ला युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव, त्यानंतर एप्रिल २००७ ला उत्तरी पीतमपुरा वॉर्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या. तर २००७-२००९ महिला कल्याण आणि बालविकास समितीच्या अध्यक्ष झाल्या. मार्च २०१० मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली, सध्या रेखा गुप्ता या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. शालिमार बाग विधानसभेच्या आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...