Wednesday, May 6, 2026
Homeक्राईमरेखा जरे हत्याप्रकरणातील आरोपीचा जल्लोष!

रेखा जरे हत्याप्रकरणातील आरोपीचा जल्लोष!

जेलबाहेर फटाके, रॅली, घोषणाबाजी || 70 ते 80 जणांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बहुर्चित रेखा जरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सागर भिंगारदिवे (रा. केडगाव) याला जामीन मिळताच, त्याने कायद्याची भीती न बाळगता जेलबाहेर बेकायदेशीर मिरवणूक काढून शहरात दहशत निर्माण केली. शहरातील जिल्हा कारागृह ते केडगाव वेसपर्यंत मिरवणुक काढून घोषणाबाजी केली, फटाके वाजवत बेदरकारपणे वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण केला.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी (23 जून) रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात सागर भिंगारदिवेसह त्याच्या 70 ते 80 अनोळखी साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अनुप झाडबुके यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सागर भिंगारदिवे याने कारागृहाबाहेर फटाके फोडत, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून घोषणाबाजी करत मोठा जमाव जमवला. पांढर्‍या व काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर, स्विफ्ट कार, दुचाक्यांचा ताफा घेऊन केडगाव वेसपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सदर प्रकाराचा व्हिडीओ व ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संशयित आरोपी व त्याचे समर्थक सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा, घोषणाबाजी, व फटाके फोडत वाहतुकीस अडथळा निर्माण करत होते.

यामुळे समाजात दहशत निर्माण करण्याचा उद्देश स्पष्टपणे दिसून येत असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला, तसेच जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांची गुन्हा दाखल करून चौकशी सुरू असून, मिरवणुकीतील व्हिडीओ आणि वाहनांची तपासणी करून अधिक संशयित आरोपींची ओळख पटवली जात आहे.

ताज्या बातम्या

Accident News : माळशेज घाटात बस-स्कॉर्पिओ अपघात; वडाळा-भेंड्यातील अंगणवाडी सेविकेसह चौघांचा...

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि. 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा व...