Friday, May 3, 2024
Homeनगररेखा जरे हत्याकांड : उच्च न्यायालयाने बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

रेखा जरे हत्याकांड : उच्च न्यायालयाने बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अहमदनगर|Ahmedagar

रेखा जरे हत्याकांडात मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज फेटाळला.

- Advertisement -

जामीन अर्ज फेटाळल्याने बोठे याच्या अडचणी वाढल्या आहेत. याचबरोबर पोलिसांवर देखील बोठे याच्या अटकेसाठी दबाव वाढला आहे.

रेखा जरे यांची हत्या पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात येथे झाली होती. 30 नोव्हेंबरला ही हत्या झाली. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. पोलीस तपासात जरे यांच्या हत्याकांडाला मागे बोठे हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. तसे तांत्रिक सबळ पुरावे मिळाले आहेत. अटक होणार या भीतीनेच बोठे दोन महिन्यांपासून पसार आहे. बोठे याला अटक करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयामार्फत स्टॅंडिंग वॉरंट देखील जारी केले आहे. तरीदेखील बोठे याच्या शोधात पोलिसांना यश आलेले नाही.

बोठे याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात देखील प्रयत्न केले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्याने धाव घेतली. तेथेही आज जामीन फेटाळला. त्यामुळे बोठे याच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या