Friday, May 3, 2024
Homeनाशिक१७ महिला कामगारांना कामावरुन काढले

१७ महिला कामगारांना कामावरुन काढले

नाशिक | Nashik

शहरातील फाळके स्मारक येथे काम करणाऱ्या महिलांना कामावरून अचानक बडतर्फ करण्यात आले आहे.

- Advertisement -

मागील चौदा वर्षांपासून शहरातील फाळके स्मारक येथे कमी वेतनात काम सतरा महिला काम करीत होत्या.

परंतु ऐन करोनाच्या संकटात त्यांना वयाचे कारण सांगून या महिलांना कामावरुन काढून टाकले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कामगार विभागाचे पत्रानुसार त्यांना कोविड च्या काळात वेतन दिले पाहिजे होते, परंतु दिले गेले नाही. तसेच आत्मनिर्भर असलेल्या या कष्टकरी महिलांना कामावर घेतले तर उपजीविका करू शकतील, त्यामुळे लवकरात लवकर महापालिकेने आम्हाला कामावर रुजू करावे असा आशावाद येथील महिलांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या