Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशनेहरू संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीचे नामांतर

नेहरू संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीचे नामांतर

नवी दिल्ली | New Delhi

शहरे, स्टेशन्स आणि काही वास्तुंची नावे बदलण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच असून यात आता नवी दिल्लीतील नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीची (Neheru Memorial Museum And Library) भर पडली आहे. केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) या संस्थेचे नाव बदलले आहे. यावरून काँग्रेसने (Indian National Congress) मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असून काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारच्या या भुमिकेला विरोध केला आहे.

- Advertisement -

दिल्ली येथील नेहरू संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीचे नाव बदलण्यात आले आहे. पंतप्रधान संग्रहालय आणि पुस्तकालय, असे नवीन नाव देण्यात आले आहे. यावरुन कॉंग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. द्वेषाचे दुसरे नाव नरेंद्र मोदी आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केली आहे.

सरकार जाहिरात अन् बॅनरबाजीत अडकत असेल तर…; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीच्या एका विशेष बैठकीत याचे नाव बदलून पंतप्रधान वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालय ( Prime Ministers Museum & Society) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि म्युझियमचे उपाध्यक्ष राजनाथ सिंह होते. सिंह यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली असून या बैठकीत नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कॉंग्रेसने भाजपवर टीका केली आहे.

या संग्रहालयाचे नाव वर्तमान परिस्थितींना अनुसरुन असावे, या संग्रहालयात लोकशाही मुल्यांचे दर्शन घडवणाऱ्या गोष्टी आहेत. भारत निर्माणासाठी प्रत्येक पंतप्रधान यांनी दिलेल्या योगदानाची माहितीही आहे. मात्र, या संग्रहालयाचे नाव बदलल्याने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

‘अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन’, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

गेल्या ५९ वर्षांपासून नेहरू स्मारक संग्रहालय आणि पुस्तकालय हे ऐतिकाहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे पुस्तकांचा खजिना व ऐतिहासिक दस्तावेज आहेत. आता हे संग्राहलय पंतप्रधान संग्रहालय आणि सोसायटीच्या नावाने ओळखले जाईल. राष्ट्र आणि राज्यांच्या शिल्पकारांची अवहेलना करण्यासाठी मोदी सर्वोतोपतरी प्रयत्न करत आहेत. असुरक्षिततेची भावना असलेले मोदी हे स्वंयघोषित विश्वगुरु आहेत, असा टोला कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी लगावला.

दिल्लीत एकुण २७१ कोटी रूपये खर्च करून संग्रहालय उभारण्यात आले आहे. दिल्लीतील मूर्ती कॉम्प्लेक्समध्ये ही वास्तु उभारण्यात आली आहे. एकुण १४ पंतप्रधानांची माहिती ही म्युझियमच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यासाठी पुरेशी जागा असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. या संग्रहालयाचा एक ब्लॉक हा नेहरू संग्रहालय म्हणून ओळखला जातो. या दोन्ही ब्लॉक्सचे एकत्रित क्षेत्रफळ १५,६०० चौरस मीटरहून अधिक आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या