दरवर्षी प्रत्येक भारतीय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे, २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन! १९५० मध्ये या दिवशी आपले संविधान लागू झाले. ज्याने भारताला एक स्वतंत्र आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. हा दिवस आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्ये आठवून देतो आणि देशाची सेवा करण्याची प्रेरणा देतो.
प्रजासत्ताक दिनी, आम्ही आमच्या स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांच्या योगदानाचा आदर करतो याच विषयावर राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु. संकष्टी भाऊसाहेब जाधव हिने केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या विद्यार्थिनीच्या भाषणाने उपस्थित पालक शिक्षक व ग्रामस्थांची मने जिंकलेले आहे तीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे