Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी मार्गदर्शन करणार

काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी मार्गदर्शन करणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सर्व प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षण शिबिरात आगामी काळातील काँग्रेस पक्षाची दृष्टी आणि दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, काँग्रेसची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा, मुद्दे आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही संवादात महत्त्व दिले जाणार आहे.

राज्य आणि देशपातळीवरील विविध क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक आणि तज्ज्ञ या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय वॉर रूमचे अध्यक्ष खासदार शशिकांत सेंथिल तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेते प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत. सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय काँग्रेस समितीची टीम प्रशिक्षणाची धुरा सांभाळणार आहे.

ताज्या बातम्या

Gunratan Sadavarte : “ठाकरे बंधूंनी शपथ घेऊन सांगावे मोर्चा नक्की कशासाठी?”...

0
मुंबई | Mumbai देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्या कार्यपद्धतीवर दोन सहआयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती, असे वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने...