Friday, May 3, 2024
Homeनाशिकगिरणारे : आदिवासी महामंडळाच्या भात खरेदीस प्रतिसाद

गिरणारे : आदिवासी महामंडळाच्या भात खरेदीस प्रतिसाद

नाशिक । Nashik

गिरणारे ता नाशिक येथील भात खरेदीस शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आदिवासी महामंडळाच्या गोडावूनला भातास १८८८ रुपये क्विंटल तसेच साधारण भातास १८६८ रु भाव महामंडळाकडून दिला जात आहे.

- Advertisement -

एकूणच त्यासोबत मिळणारे अनुदान व भात खरेदीची रक्कम आदिवासी शेतकऱ्यांना थेट बैंक खात्यात जमा केली जात आहे.

यंदा ऐन काढणीच्या वेळी झालेला मुसळधार पाऊस व त्यात भाताचे मोठे नुकसान यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. परंतु करोनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी भात विक्रीस आणले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या