Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : निवृत्त कर्नलची 13.92 लाखांची फसवणूक

Crime News : निवृत्त कर्नलची 13.92 लाखांची फसवणूक

पुणे, बेळगाव व अहिल्यानगरमधील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

फ्लॅट खरेदीसाठी बुकिंग करून घेतलेली 13 लाख 92 हजार 625 रुपयांची अग्रीम रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त कर्नलच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे, बेळगाव आणि अहिल्यानगर येथील आरोपींचा यामध्ये समावेश आहे. हा प्रकार नगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी भोम दुबे (वय 65, रा. सारसनगर) यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतीश वामन गिरी (रा. लोटस रेसिडेन्सी, संगम प्रेससमोर, कोथरूड, पुणे), दिलीप प्रेमराज चंडक (रा. मिरा मेहल, फर्स्ट क्रॉस रोड, आदर्शनगर, बेळगाव), सुशिल हनुमानदास सारडा (रा. सारडा लेन, अहिल्यानगर) आणि सुयश रविंद्र लुणावत (रा. कस्तुर कुंज, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी एल.एस. व्ही.एस. डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून फिर्यादीला फ्लॅट खरेदी करण्याबाबत व्यवहार केला. फ्लॅट खरेदीसाठी फिर्यादीकडून एकूण 13 लाख 92 हजार 625 रुपये अग्रीम रक्कम घेऊन बुकिंग करण्यात आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सदर रक्कम परत करण्यात आली नाही, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

फ्लॅटच्या व्यवहारासाठी रक्कम स्वीकारल्यानंतर ती परत न करता आरोपींनी फिर्यादीचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात चौघांची भूमिका काय होती, तसेच घेतलेली रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी वापरण्यात आली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. हा व्यवहार 13 मे 2013 ते 18 सप्टेंबर 2026 या कालावधीत नगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दप्तर फेकून विद्यार्थ्याला शिक्षा; बाल न्याय कायद्यांतर्गत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अभ्यास करताना क्लासमध्ये खोडकरपणा केल्याने विद्यार्थ्याला (Student) शिक्षा देणे आणि त्या शिक्षेचा अतिरेक करून त्याला मानसिक अथवा शारीरिक त्रास देणे,...