Friday, May 3, 2024
Homeजळगावलाचखोरीच्या कारवायांमध्ये महसूल विभाग अव्वलस्थानी

लाचखोरीच्या कारवायांमध्ये महसूल विभाग अव्वलस्थानी

अमोल कासार

जळगाव jalgaon।

- Advertisement -

भष्ट्राचार आणि लाचखोरी ही देशाला लागलेली किड आहे. ही किड नष्ट करण्यासाठी शासनाने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग तयार केला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division) वर्षभरात दहा विविध शासकीय विभागातील लाचखोर अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर कारवाई केली आहे. वर्षभरात 27 कारवाया केल्या असून यामध्ये महसूल विभागाच्या (Revenue department) सात कारवाई झाल्या आहे. त्यामुळे महसूल विभाग लाचखोरीच्या (bribery activities) अव्वलस्थानी आहेत.

शासकीय कार्यालयात अडकेलेले काम किंवा आपले काम वेळेत व्हावे यासाठी चिरीमिरी देवूनच काम होत असते. त्यामुळे कुठलेही काम करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याने अनेक कामांना भष्ट्राचाराची किड लागलेली आहे. लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असून या विभागाच्या माध्यमातून लाचखोरांवर नजर ठेवली जात असते. या विभागाकडे तक्रार आल्यास हा विभागाकडून कारवाई करुन त्यांना आळा घातला जातो.

सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण हे शासकीय कार्यालयांमध्ये होत असल्याचे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेल्या कारवाईतून उघड झाले आहेत. जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत वर्षभरात लाचलचूपत प्रतिबंधक विभागाकडून शासकीय कार्यालयांमध्ये 27 वेळा कारवाई झाली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई महसूल विभागाशी निगडीत असलेल्या विभागांमध्ये झाली असल्याने महसूल विभागच कारवाईच्या रडावर असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. या कारवाया लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.

विभागनिहाय झालेली कारवाई

महसूल विभागातील-

तहसील कार्यालय चोपडा, कोतवाल व खासगी इसम किनगाव, तहसिलदार- चालक-तलाठी- बोदवड, जळगाव तहसिल कार्यालय खासगी इसम, अव्वल कारकून कोषागार शाखा, संजय गांधी निराधार योजना जळगाव, मंडळ अधिकारी व तलाठी अमळनेर अशा एकूण सात वेळा कारवाई झाली आहे.

पोलीस विभाग-

पोलीस उपनिरीक्षक मेहुणबारे पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, पोलीस हवालदार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, पोलीस हवालदार पाचोरा पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक सावदा पोलीस स्टेशन अशा एकूण 5 वेळा कारवाई झाली आहे.

जिल्हा परिषद विभाग-

कनिष्ठ लिपीक पंचायत समिती जामनेर, गटशिक्षणाधिकारी व एक कंत्राटी धरणगाव, ग्रामविकास अधिकारी चोपडा, ग्रामसेवक व सरपंच पती पिंपळगाव हरेश्वर अशा एकूण 3 वेळा कारवाई झाली आहे.

VISUAL STORY : मानसी नाईक नंतर ही अभिनेत्री होणार पती पासून विभक्त

वजन मापे विभाग

वैध मापन शास्त्र निरीक्षक रावेर, वैध मापन शास्त्र निरीक्षक पहूर अशा एकूण दोन वेळा कारवाई झाली आहे.

एम.एस.ई. बी. विभाग-

सहाय्यक अभियंता जामनेर, खासगी ईसम एमआयडीसी पोलीस स्टेशन, वायरमन अमळनेर अशा एकूण तीन वेळा कारवाई झाली आहे.

सहकार विभाग

सहाय्यक सहकार अधिकारी रामानंद नगर पोलीस स्टेशन, सहाय्यक सहकार अधिकारी जिल्हापेठ पोलीस स्टेशन अशा एकूण दोन वेळा कारवाई झाली आहे.

कृषी विभाग-

कृषी सहाय्यक पाचोरा,

वनविभाग

आर. एफ. ओ. (उप- वनसंरक्षक) रावेर,

उर्जा व कामगार विभाग- शिपाई

शिक्षण विभाग- मुख्याध्यापक चाळीसगाव

दहा विभाग कारवाईच्या रडारवर

वर्षभरात लाचलूचपत प्रतिबंधक विभागातर्फे महसूल विभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद विभाग, वजन मापे विभाग, एमएसईबी विभाग, सहकार विभाग, कृषी विभाग, वन विभाग, ऊर्जा व कामगार विभाग यासह शिक्षण विभाग या दहा विभागांमध्ये लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाभरात 27 गुन्हे दाखल असून 38 संशयित आरोपी असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या