Friday, May 3, 2024
Homeनगरमहसूलच्या 159 कर्मचार्‍यांच्या बदल्या

महसूलच्या 159 कर्मचार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना लाटेमुळे दोन वर्षांपासून महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्या रखडल्या होत्या. राज्य शासनाने कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे निर्दश दिले. त्यानुसार बदलीस पात्र असलेल्या 143 महसूल सहाय्यक (लिपिक)आणि 16 शिपाई अशा 159 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूल तहसीलदार माधुरी आंधळे यांनी दिली.

- Advertisement -

शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना मे महिन्यात बदल्यांचे वेध लागतात. दरवर्षी 31 मे अखेर बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रशासकीय आणि विनंती बदल्या केल्या जातात. जिल्हा परिषद, पोलीस व इतर काही शासकीय कार्यालयांत कर्मचारी बदल्यांचे काम पूर्ण झाले आहे.

महसूल विभागाचे जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या बदल्या झालेल्या असून या जागांवर नवीन अधिकारी नियुक्त झालेले आहेत. एप्रिल महिन्यात 10 उपजिल्हाधिकारी व सहा तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडलाअधिकारी, महसूल सहायक, व वाहनचालक संवर्गातील पात्र अधिकारी- कर्मचार्‍यांच्या बदल्या रखडल्या होत्या. जिल्ह्यात एकूण कार्यरत संख्येच्या 30 टक्के कर्मचारी बदलीस पात्र होते. त्यानुसार 77 मंडल अधिकारी व अव्वल कारकून, 62 लिपिक (महसूल सहायक), 4 वाहनचालक, वर्ग-चारचे 16 कर्मचारी बदलीस पात्र होते. जिल्हा प्रशासनाने बदली पात्र कर्मचार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर 30 जून रोजी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या