Wednesday, February 4, 2026
Homeक्रीडाIND A vs SA A : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारत अ संघाची घोषणा;...

IND A vs SA A : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारत अ संघाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा

मुंबई । Mumbai

दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहे. तत्पूर्वी, भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यात दोन चार दिवसीय कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यांसाठी भारतीय ‘अ’ संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

पहिला आणि दुसरा अशा दोन्ही चार दिवसीय सामन्यांसाठी साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, तनुश कोटियन आणि मानव सुथार या खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे साई सुदर्शनची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

YouTube video player

दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी निवडलेल्या संघात भारतीय कसोटी संघातील अनेक दिग्गज खेळाडूंची उपस्थिती लक्षणीय आहे. यामध्ये अनुभवी फलंदाज केएल राहुल, यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. तसेच, आकाश दीप आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान मिळाले आहे.

भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील पहिला चार दिवसीय सामना ३० ऑक्टोबरपासून सुरू होईल. यानंतर दुसरा सामना ६ नोव्हेंबर रोजी होईल. हे दोन्ही सामने बंगळूरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (Centre of Excellence) मैदानात खेळवले जातील. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघानेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघाचा नियमित सदस्य आणि माजी कर्णधार टेंबा बावुमा दुसऱ्या ‘अ’ सामन्यात खेळताना दिसणार आहे.

पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ:

ऋषभ पंत (कर्णधार/यष्टिरक्षक), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (यष्टिरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुश कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी, सरांश जैन.

दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ:

ऋषभ पंत (कर्णधार/यष्टिरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथर, सौरभ कुमार, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, अभिमन्यू ईश्वरन.

‘अ’ संघाच्या सामन्यानंतर वरिष्ठ भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे.

  • पहिली कसोटी: १४ ते १८ नोव्हेंबर (ईडन गार्डन्स, कोलकाता)
  • दुसरी कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर (एसीए स्टेडियम, गुवाहाटी)
  • पहिली एकदिवसीय: ३० नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम, रांची)
  • दुसरी एकदिवसीय: ३ डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम, रायपूर)
  • तिसरी एकदिवसीय: ६ डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम)
  • पहिली टी-२०: ९ डिसेंबर (बारबती स्टेडियम, कटक)
  • दुसरी टी-२०: ११ डिसेंबर (पीसीए स्टेडियम, मोहाली)
  • तिसरी टी-२०: १४ डिसेंबर (एचपीसीए स्टेडियम, धरमशाला)
  • चौथी टी-२०: १७ डिसेंबर (एकाना स्टेडियम, लखनऊ)
  • पाचवी टी-२०: १९ डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा

0
नाशिक | प्रतिनिधी भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी आपल्याकडे असलेल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली...