Friday, May 3, 2024
HomeनाशिकDYFI च्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरगाण्यात रास्ता रोको

DYFI च्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरगाण्यात रास्ता रोको

प्रतिनिधी | सुरगाणा | Surgana

सुरगाणा (Surgana) तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांसह विविध मागण्यांसाठी लाडगाव फाटा येथे भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) आणि सुरगाणा तालुका कमिटीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले…

- Advertisement -

यावेळी आंदोलकांनी आरोग्य केंद्रातील (Health center) समस्या त्वरित सुधाराव्या, आश्रम शाळेतील साहित्य, तालुक्यातील रस्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO), लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे त्वरित सुरु करावीत, खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी, तसेच २०२२ मध्ये उद्घाटन झालेली कामे त्वरित सुरु करून जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी DYFI या संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. इंद्रजीत गावीत, तालुका सेक्रेटरी कॉ. पांडुरंग गायकवाड, अध्यक्ष कॉ. नितीन गावीत  उपाध्यक्ष कॉ अशोक धूम कॉ चंद्रकांत वाघेरे , रोहिणी वाघेरे यांनी केले. मेनकाताई पवार, मनीषाताई महाले, भारती चौधरी अशोक भोये, संजिवनी चौधरी सरपंच-लाडगाव, सुशिला हिमतन गायकवाड, कैलाश भोये यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या