Friday, May 3, 2024
Homeनाशिकवाहतूक कोंडीमूळे गुदमरतोय रस्त्यांचा श्वास

वाहतूक कोंडीमूळे गुदमरतोय रस्त्यांचा श्वास

नाशिक । Nashik
बेशिस्तपणे रस्त्यावर उभी असलेली वाहने, पोलिसांचा कोणताही धाक नाही, पार्किगसाठी पुरेशी जागा नाही, यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुक कोंंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेनरोड्, शालीमार, सीबीएस, द्वारका, रविवार कारंजा, निमाणी बसस्थानक, जि.प. कार्यालयासमोरील रस्ता आदीसह शहरातील विविध ठिकाणी वाहतूक कोंडीमूळे रस्त्याचा श्वास गुद्मरत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान पाद्चारी नागरिक, कामानिमित्त जाणारे नोकरदार आदी सर्वाना या वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतो आहे, कितीतरी वेळ या वाहतूक कोंडीत जात असल्याने वाहतूक शाखेने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. वाहनधारकांबरोबरच व्यावसायिकांनाही याचा फट्का बसतो आहे. कालिदास कलामदिर, मेनरोड् आदीसह विविध ठिकाणी वाहतूक रस्त्याच्या बाजूलाच खोद्काम झाल्याने आणि ते वेळेवर होत नसल्याने यामुळे उलट वाहतूक कोंडी होत आहे.

- Advertisement -

यासह रस्त्यावरच वाहने उभी केल्याने फुट्पाथवरुन चालायचा जागा राहत नाही, यामुळे दूचाकीसह चारचाकी वाहनांची गर्दी एकाचवेळी होउन वाहतूकीला मोठा फट्का बसतो आहे. वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी वाहनधारकांनी स्वयशिस्त लावण्याची गरज आहे, अनेकदा सिग्गलचे नियम धाब्यावर बसवले जात आहे, झेब्रा क्रॉसींगकडे दूल क्षर् केले जाते, रस्ता ओलांड्ताना नागरिकांना अपघाताची भीती असते.

वाहतूकीला लगाम घालण्यासाठी वाहनधारकांकडून जास्त द्ंड आकारणे, वाहतूक पोलिसांची अधिक गस्त वाढ्विणे, आणि बेशिस्त वाहनचालकांचा परवाना रद्द करावा. अशी मागणी खुद्द जागरुक वाहनधारकांनी केली आहे. शहरातील काही भागात मुख्य वाहतुकीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडे, ट्पर्‍यांनी विळ्खा घातल्याने रस्त्याची रुंदी कमी होउन समस्या निर्माण होत आहे, पालिका प्रशासनाच्या अतिक्रमन विभागाने फुट्पाथावर वाढ्लेल्या ट्पर्‍यांच्या संख्येकडे लक्ष देण्याची मागणी सुजान नागरिकांकडून होत आहे.

बेशिस्तवाहनधारकांवर कड्क कारवाइ करावी
शहरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच बाब झाली असून वाहनांसाठी रस्ता कमी पड्तो आहे, वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनधारकांवर अधिक क ड्क कारवाइ करावी.जेणेकरुन कोणीही नियम मोड्णार नाही, दूचाकी, चारचाकी वाहनधारकांनी वाहतूकीच्या सव र्नियमांचे पालन करावे,
ऋषीकेश कदम, वाहनधारक

- Advertisment -

ताज्या बातम्या