Thursday, May 2, 2024
Homeनगररद्द व काम बंद केलेल्या रस्त्यांचा निधी शासनास पुन्हा वर्ग करण्यात येऊ...

रद्द व काम बंद केलेल्या रस्त्यांचा निधी शासनास पुन्हा वर्ग करण्यात येऊ नये

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील रद्द केलेल्या व काम बंद केलेल्या रस्त्यांचा निधी शासनास पुन्हा वर्ग करण्यात येऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील गावांना जोडण्याकरिता रस्ते चांगल्या अवस्थेत नाहीत व काही गावांना जोडण्याकरिता 1947 पासून आजतागायत रस्ते देखील झालेले नाही. महाविकास आघाडी सरकार असताना श्रीरामपूर तालुक्यात गावांना जोडण्याकरिता नवीन रस्ते व जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्याकरिता 5 कोटी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. यातील काही गावांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नवीन रस्ते मिळणार होते. रस्त्यांसाठी निधी मंजूर होऊन काही रस्त्यांचे टेंडर देखील निघाले होते.

पण सध्याच्या शिवसेना (शिंदे गट)- भाजप युती सरकारने महाविकास आघाडी सरकार अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या सर्व कामांवर 20.07.2022 व 12.10.2022 च्या पत्रान्वये स्थगिती आणून काही काम रद्द देखील केले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीरामपूर तालुक्यातील काही गावांना जोडणार्‍या रस्त्यांचे काम अपुरे राहू नये व सदर रस्त्यांकरिता मंजूर केलेला निधी परत शासनास वर्ग होऊ नये म्हणून महांकाळ वडगाव ग्रामपंचायत व मातुलठाण ग्रामपंचायत यांनी अ‍ॅड. अजित काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने सदर ग्रामपंचायतींना जोडणार्‍या रस्त्यांचा निधी सरकारकडे पुन्हा वर्ग करण्यास स्थगिती दिली असून सदर निधी संदर्भात यथास्थिती राखण्याचे निर्देश दिले. सदर निर्देश हे श्रीरामपूर तालुक्यातील पुढील रस्त्यांच्या कामाकरिता व डागडूजी करिता देण्यात आले-

1.खंडाळा येथील रांजणखोल मोरी ते खंडाला पूल येथील श्रीरामपूर हद्दीतील रस्ता, 2. खोकर-खानापूर रस्ता (रा.मा. 216), 3. प्रजिमा 21 ते वळदगाव- निपाणी वडगाव- खोकर- टाकळीभान- महांकाल वडगाव- सरला- नाऊर् रस्ता, 4. नाऊर ते रामपूर रस्ता, 5. गोवर्धन ते रामपूर रस्ता, 6. नऊर् येथील गोपीनाथ शिंदे वस्ती रस्ता ते साईखेडकर गंगा जुना रस्ता, 7. शिरसगाव ते इतर जिल्हा मार्ग 41, 8. शिरसगाव ते भोगळ वस्ती अंतर्गत रस्ता, 9. वडाळा महादेव ते निपाणी वडगाव रस्ता

10. भैरवनाथ नगर ते तुपे वस्ती रस्ता, 21. महांकाल वडगाव ते सरला रस्ता, 22. शिरसगाव अंतर्गत रस्ते, 23. खंडाळा येथील संगमनेर रोड ते ग्रामदैवत म्हसोबा मंदिर रस्ता, 24. फत्याबाद ते बाबा आठरे वस्ती ते चांदेवाडी रस्ता, 25. दत्तनगर ग्रामपंचायत हद्दीतील आर्या हॉटेल ते डी.पॉल इंग्लिश मीडियम स्कूल रस्ता, 26. दत्तनगर येथील सूतगिरणी फाटा ते रेल्वे गेट पर्यंत रस्ता, 27. गळणी ते चारी नंबर चार येथील पगारे वस्ती, भागवत वस्ती, बाच्कर वस्ती, शिंदे वस्ती रस्ता, 28. वडाळा महादेव ते क्रेशर रस्ता, 29. अशोकनगर- निपाणी वडगाव अंतर्गत रस्ता, 30. पडेगाव जुना गावठाण ते बोधेगाव रस्ता.

या प्रकरणात पुढील सूनवाई 6 एप्रिल 2023 रोजी ठेवण्यात आलेली असून सदर प्रकरणात अ‍ॅड. अजित काळे यांच्यासोबत अ‍ॅड. साक्षी काळे व अ‍ॅड. प्रतीक तलवार यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या