Friday, September 11, 2026
HomeनगरAhilyanagar : 776 रस्त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश

Ahilyanagar : 776 रस्त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मनपाच्या 776 रस्त्याच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी किरण काळे यांनी खासगी फिर्याद दाखल केली होती. मनपाकडून 2016 ते 2020 या कालावधीत झालेली 776 रस्त्यांची कामे, एकच काम नाव बदलून दोन किंवा अधिक वेळा दाखवून निधी लाटणे, कामे न करताच केल्याचे कागदोपत्री दाखवून गुणवत्तेचे खोटे, बनावट टेस्ट रिपोर्ट सादर करत कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

याबाबत ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख व या प्रकरणातील तक्रारदार काळे यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या खाजगी फिर्याद अर्जावर सुनावणी करताना नगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी के. एम. सोनवणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना बीएनएसएस 2023 च्या कलम 175 (3) अन्वये 30 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या प्रकरणात अ‍ॅड. राहुल पवार यांनी तक्रादाराच्या वतीने जिल्हा न्यायालयासमोर केलेल्या युक्तीवादा नंतर कोर्टाने आदेश केला.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये देखील जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये अभिजीत दरंदले यांनी युक्तिवाद केला. या कारवाईमुळे खाजगी फिर्यादीत नमूद महापालिकेतील तत्कालीन अधिकारी, ठेकेदारांसह 30 ते 40 संशयितांचे धाबे दणाणले असल्याचा दावा काळे यांयनी केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाची चाहूल; ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरही कोरडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके होरपळून निघत असून राहुरी, श्रीरामपूर,...