Friday, May 3, 2024
Homeधुळेदोंडाईचात पावसामुळे रस्त्यांची लागली वाट

दोंडाईचात पावसामुळे रस्त्यांची लागली वाट

दोंडाईचा Dondaicha। वि.प्र.

गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप (drizzle of rain) सुरु आहे. यामुळे काही अपवाद वगळता रस्त्यांची दुरवस्था (Bad condition of roads) झाली आहे. भीज पावसामुळे रस्त्यांची वाट लागली आहे.

- Advertisement -

इस्लामपूरा, जुने भतवाल थिएटर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. शिवाय रस्त्यावर मातीचा ढीग पडल्याने या भागातील रहिवाशांची गैरसोय होत आहे. दोन दिवसानंतर पालिकेकडून अद्याप केवळ एक ट्रॅक्टर माती उचलेली नाही. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. आडगाडे डेअरी जवळून केशरानंद पेट्रोल पंपाकडे आणि जे. जे. हॉस्पीटलकडे जाणारा रस्त्यावर पाणी साचले आहे. पूर्ण रस्ता खड्ड्यात गेल्यामुळे खड्ड्यातून जाण्याऐवजी उर्वरित रस्त्यावरून प्रत्येक जण जाण्याचा प्रयत्नातून दिवसभरात किमान चार – पाच जण खड्ड्यात पडल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. यामुळे किमान खड्डे बुजवणे आवश्यक आहे.

शामसुंदर प्रोव्हिजनकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कडे आणि नंदुरबार चौफुलीकडे जाणारा रस्ताची अवस्था देखील बिकट झाली आहे.

भीज पावसामुळे पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीचा पंचनामा केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे महसूल प्रशासनाकडे 65 मिमी पाऊस झाला असल्याची नोंद होणे आवश्यक आहे. यामुळे घरांची पडझड झालेल्या नागरिकांची पदरी निराशाच पडणार आहे.

रस्त्याच्या बाबतीत पालिका प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे. पालिकेच्या निवडणूकीची तयारी साठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या