Sunday, October 18, 2026
Homeक्राईमCrime News : कुख्यात घायाळ टोळीच्या चास घाटाजवळ आवळल्या मुसक्या

Crime News : कुख्यात घायाळ टोळीच्या चास घाटाजवळ आवळल्या मुसक्या

एलसीबीची कामगिरी || घातक शस्त्रांसह 7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कुख्यात गुंड गौरव घायाळ व त्याच्या चार साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चास घाटाजवळ दरोड्याच्या तयारीत असताना सापळा रचून अटक केली. या कारवाईतून पोलिसांनी तब्बल 7 लाख 90 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित आरोपींविरुद्ध दरोडा तयारीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडा व मालाविरुद्धच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

या मोहिमेत पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, तसेच अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय घोडके, सुरेश माळी, अतुल लोटके, भिमराज खर्से, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोखे, सोमनाथ झांबरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, भगवान धुळे, महादेव भांड यांचे पथक सहभागी आहे. शनिवार, 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पथक नगर तालुका हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे चास घाटाजवळ छापा टाकण्यात आला. काळ्या रंगाची इनोव्हा कार अंधारात उभी करून संशयित दरोड्याची तयारी करत असल्याचे पोलिसांना दिसले.

पथकाने तत्काळ शिताफीने हालचाल करून संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये गौरव घायाळ (24, रा. सुपा, ता. पारनेर), सतिष पावडे (35, रा. दरोडी, ता. पारनेर, हल्ली सुपा), अनिकेत साळवे (29, रा. सुपा), विशाल जाधव (23, रा. सुपा), गोविंद गाडे (36, रा. सुपा) यांचा समावेश आहे. संशयितांची पंचासमक्ष झडती घेतली असता, 1 पिस्तुल व 1 जिवंत काडतूस, 1 तलवार, 1 गिलव्हर, 1 बेसबॉलचा दांडका, 6 मोबाईल, इनोव्हा कार असा एकूण 7 लाख 90 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गौरव घायाळचा गुन्हेगारी इतिहास
मुख्य आरोपी गौरव हरीभाऊ घायाळ हा पारनेर तालुक्यातील कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी पारनेर, सुपा, एमआयडीसी व विविध पोलीस ठाण्यांत तब्बल 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात हाणामारी, सरकारी कामात अडथळा आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...