Saturday, June 13, 2026
Homeक्राईमCrime News : दरोडा व जबरी चोरी करणारे दोघे गजाआड

Crime News : दरोडा व जबरी चोरी करणारे दोघे गजाआड

नगर तालुक्यातील तीन गुन्ह्यांची उकल || एलसीबीची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा व जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन संशयित आरोपींना अटक करून तीन गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल असा एकूण तीन लाख 12 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रतिभा पंढरीनाथ साठे (रा. नारायणडोह, ता. अहिल्यानगर) यांच्या घरी 22 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पाच चोरट्यांनी दरोडा टाकला होता. पंढरीनाथ साठे घरासमोर झोपलेले असताना दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केला. त्यानंतर कटावणीच्या साहाय्याने घराचा दरवाजा उचकटून घरातील सदस्यांना काठ्यांनी मारहाण करत सुमारे दोन लाख 17 हजार 500 रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेले होते.

- Advertisement -

या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक हरिष भोये, अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, अतुल लोटके, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, ज्योती शिंदे, भगवान धुळे यांचे पथक तयार करण्यात आले.

तपासादरम्यान बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा सोमीनाथ उर्फ पिप्या मिनाजी काळे (वय 30, रा. कौंडगाव तांडा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) व त्याचे साथीदारांनी केला असून ते कारमधून चांदबीबी महाल परिसरातून वाळुंजकडे जाणार आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदबीबी महाल परिसरात सापळा रचून संशयित कार अडवून त्यातील दोन इसमांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी आपली नावे सोमीनाथ उर्फ पिप्या मिनाजी काळे व चिंग्या उर्फ सौरभ सचिन काळे (वय 21, रा. कौंडगाव तांडा) अशी सांगितली. सखोल तपासात त्यांनी सदर गुन्हा हा चिक्या गोप्या चव्हाण, तुषार नंदू भोसले, आसिफ निमाजी काळे व भगवान इंपीरियल चव्हाण (सर्व रा. कौंडगाव तांडा) यांच्या साथीने केल्याची कबुली दिली. या कबुलीच्या आधारे अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यातील दोन तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ताज्या बातम्या

Sanjay Raut : राजकारणात पक्ष फोडणे, माणसे विकत घेणे ही एक...

0
पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडणे, माणसे विकत घेणे ही एक प्रकारची विकृती आहे. जेव्हापासून या देशात आणि महाराष्ट्रात मोदी-शहांचे राज्य आले आहे, तेव्हापासून राजकारणातील...