Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी आता रोबो

करोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी आता रोबो

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – मुंबई-पुण्यात करोनाचा उपचार करणार्‍या डॉक्टर आणि नर्सला करोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे पुण्यात करोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी आता रोबो दाखल करण्यात आला आहे. हा रोबो रुग्णाच्या बेडपर्यंत त्याला जेवण, नाश्ता, पाणी, औषध या सर्व गोष्टी देणार आहे.

- Advertisement -

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई रुग्णालयात रोबो सध्या कार्यरत आहे. हा रोबो 50 मीटर ते 70 मीटरच्या अंतरावर रिमोटच्या मदतीने काम करतो. एका बटणाच्या क्लिकवर हा रोबो करोना पेशंटच्या बेडपर्यंत जेवण, पाण्याची बॉटल, औषधे इत्यादी वस्तू घेऊन जातो. दररोज दिवसातून किमान दोन किंवा तीन तास हा रोबो काम करतो.

मात्र हा रोबो येण्यापूर्वी अनेक आरोग्य कर्मचार्‍यांना पाण्याची बॉटल, औषध घेऊन रुग्णाकडे जावं लागतं होतं. यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये दोन ते तीन कर्मचार्‍यांची गरज भासायची. मात्र या रोबोमुळे एकाचवेळी 20 ते 25 किलो जेवण, नाश्ता आणि औषधं नेण्याची सोय झाली आहे. या रोबोसाठी 45 ते 50 हजारांचा खर्च आला.

दरम्यान टेली रोबटच्या माध्यमातून डायरेक्ट सूचना देता येतील का? या संदर्भात संशोधन सुरु आहे. त्यानंतर आणखी रोबो तयार करण्याचे नियोजन केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या