Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: "निवडणुका होत्या तर १०-१० मंत्री याचे आणि आता मात्र…"; रोहित...

Rohit Pawar: “निवडणुका होत्या तर १०-१० मंत्री याचे आणि आता मात्र…”; रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे पाच दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मनोज जरांगेंना पाठींबा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच, आज (दि. 2 सप्टेंबर) दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले असून, मुंबई पोलिसांनीही जरांगे पाटलांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?
निवडणुका होत्या तरत १०-१० मंत्री यायचे आणि आता…
रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला. रोहित पवार म्हणाले की, ‘मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही आंदोलकांशी संवाद साधण्यास चर्चा करण्यास सरकारकडून एकही प्रतिनिधी येत नसेल किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न होत नसेल तर सरकारची ही भूमिका योग्य आहे का? गेल्या वेळेस निवडणुका होत्या तर 10-10 मंत्री यायचे आणि आता मात्र आंदोलकांना वाऱ्यावर सोडताय? एकीकडे आंदोलकांशी चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे मात्र जाणूनबुजून आंदोलन बदनाम करून आंदोलनाची सहानुभूती कमी करण्यासाठी कटकारस्थाने रचायची, नेरेटिव्ह सेट करायचा हे सरकारमधील काही नेत्यांना शोभते का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

चुकुनही चूक करु नका
रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, आंदोलक युवांना विनंती आहे ‘चुकुनही चूक करू नका’ कारण हे गेंड्याच्या कातडीचे सरकार केवळ संधी शोधत आहे. सर्वांनी शांतता ठेवत नियम पाळायलाच हवेत. सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता चर्चा करत तत्काळ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुख्यमंत्री गणपती दर्शनात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेत तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा पत्ताच नाही. एवढा संवेदनशील प्रश्न असताना हे सरकार अजूनही झोपेचे सोंग का घेत आहे? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाचा अपघात; सर्वजण सुखरूप

0
मुंबई |खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याची...