Saturday, September 5, 2026
HomeराजकीयRohit Pawar : रोहित पवार दादांच्या मदतीला धावले; IPS अंजना कृष्णा प्रकरणावर...

Rohit Pawar : रोहित पवार दादांच्या मदतीला धावले; IPS अंजना कृष्णा प्रकरणावर पोस्ट, म्हणाले “मित्रपक्षाकडून जाणीवपूर्वक…”

मुंबई । Mumbai

- Advertisement -

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होत असलेल्या टीकेला आता त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांशी बोलतानाचा अजित पवारांचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली आहे.

रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजित पवारांच्या हिंदी भाषेच्या आणि बोलण्याच्या शैलीमुळे गैरसमज निर्माण झाला. अजित पवार यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षांकडूनच जाणूनबुजून त्यांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मित्रपक्षातील काही ज्येष्ठ नेते आपल्या स्वार्थासाठी अंतर्गत कुरघोड्या करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सोशल मिडीया पोस्टमध्ये काय म्हटलंय?

कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की ! मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील!

राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात “चहापेक्षा किटली गरम असणारे” एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल.

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांदा ५५०० रुपये क्विंटल

0
राहाता (तालुका प्रतिनिधी) शुक्रवारी राहाता बाजार समितीत कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ५५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची राहाता बाजार समिती ५६१३ गोण्यांची आवक झाली. कांदा...