नाशिक । प्रतिनिधी Nashik
फ्रान्स येथील नीस येथे ‘वर्ल्ड आयर्नमॅन चॅम्पियनशिप’ स्पर्धेत रोहितने स्विमिंग १:२८ तासात, सायकलिंग ६:३३ तासात तर रनिंग 3:58 तासात पूर्ण करुन प्रायोजित वेळेच्या ४:४३ तास आधीच केवळ १२:१७ तासात जिंकुन भारताचा झेंडा फ्रान्स मधे रोवला. ही कामगिरी करणारा तो नाशिकचाच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलाच जलद ‘वर्ल्ड आयर्नमॅन चॅम्पियन’ठरला आहे.
फ्रान्स येथील नीस येथे ‘वर्ल्ड आयर्नमॅन चॅम्पियनशिप’ ही स्पर्धा जगात दरवर्षी फक्त फ्रान्स मधील नीस येथे पार पडते. ह्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यात भाग घेणे फार अवघड असते . जगात जे विविध ठिकाणी ‘आयर्नमॅन’ स्पर्धा जिंकतात, त्यातील ज्यांनी अगदी कमी वेळात ह्या स्पर्धा जिंकल्या आहेत आणि किती वेळा त्यांनी ‘आयर्नमॅन ‘ स्पर्धेत भाग घेतला आहे, त्यावरून ही निवड केली जाते.त्यामुळे ही स्पर्धा फक्त टॉपच्या स्पर्धकांमध्ये होते व कोणीही त्यात भाग घेऊ शकत नाही . त्यातही पुरुषांची नीस (nice) येथे वेगळी व महिलांची वेगळ्या ठिकाणी कोना (kona) येथे होते.
ही स्पर्धा अतिशय अवघड असते . सायकलिंग साठी उभे चढ २४०० मीटर (८००० फूट) असतात तर उतारही तेव्हडेच धोकेदायक असतात. त्यामुळे अनेकजण येथे पडतात आणि अॅम्बुलंसने त्यांना उचलुन न्यावे लागते. रनिंग करताना सुद्धा असेच खेळाडूची मानसिक व शारीरिक क्षमता पाहणारे चढ उतार असतात.अशी ही अवघड स्पर्धा ज्यात स्विमिंग ४ कि मी,सायकलिंग १८० कि मी व रनिंग ४२ कि मी असते.हे अंतर १७ तासात पूर्ण करायचे असते.
रोहित अमेरिकेत स्थायिक असुन त्याने ”आयर्नमॅन “ स्पर्धा आत्तापर्यंत ९ वेळा तर अल्ट्रामॅन स्पर्धा एक वेळा जिंकली आहे. नाशिकचे आयर्नमॅन , अल्ट्रामॅन तसेच जेष्ठ गिर्यारोहक डॉ सुभाष पवार ह्यांचा सुपुत्र असुन दोघेजण भारताचे नाव उज्वल करण्यात आजही सक्रिय आहेत.





