Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यपालांच्या विधानावर रोहित पवार आक्रमक, म्हणाले...

राज्यपालांच्या विधानावर रोहित पवार आक्रमक, म्हणाले…

दिल्ली | Delhi

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) वक्तव्यामुळे ते चर्चेत आलेत.

- Advertisement -

‘समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?’ असं वक्तव्य त्यांनी केलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.

यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी राज्यपालांना वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी राज्यपालांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच रोहित पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या माफीची मागणी केली. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलंय.

रोहित पवार म्हणाले, खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी.

तसेच, राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

‘आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते… चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे.’ असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

‘संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. नोट आणि व्होटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे.’ असंही राज्यपाल यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या