Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidyanand Bapat: पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण...विद्यानंद बापटांना मारहाणीवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

Vidyanand Bapat: पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण…विद्यानंद बापटांना मारहाणीवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

पुणे | Pune
पुण्यात डीजेबंदी आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावर झालेल्या अचानक हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

रोहित पवारांनी पोस्ट करत म्हटलं की, “गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे भूमिका मांडा, परंतु अशाप्रकारे गुंडगिरी केली जाणार असेल तर हे अजिबात योग्य नाही. पोलीस प्रशासनाने बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर योग्य त्या कायदेशीर कलमाअंतर्गत कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना संरक्षण पुरवावे, ही विनंती!”, असेही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

नेमके काय घटना घडली?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यानंद बापट हे टिळक रोड परिसरात गणेशोत्सवातील डीजे आणि आवाजाच्या त्रासाबाबत प्रत्यक्ष नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते. यावेळी स्थानिक एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. वाद वाढल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विद्यानंद बापट यांना भरचौकात मारहाण केली.

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण

मारहाण करणाऱ्याने काय म्हंटलं?
पुण्यात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्याधर बापट यांना भरचौकात झालेल्या मारहाण प्रकरणात आता एका कार्यकर्त्याची धक्कादायक भूमिका समोर आली आहे. “तो गणेशोत्सवाबद्दल चुकीचं बोलत होता, त्यामुळे त्याला मारायलाच पाहिजे होतं,” असं समर्थन मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यानं केलं आहे. ‘साम टीव्ही’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली.संबंधित कार्यकर्त्याने बोलताना पुढे म्हटलं की, “पुण्यात फक्त गणेशोत्सव आहे का? जो कोणी गणेशोत्सवाच्या विरोधात बोलेल, त्याला असंच कानशिलात मारणार आणि धडा शिकवणार!”

ताज्या बातम्या