Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण

पुणे | Pune
गणेशोत्सवातील डीजेच्या आवाजाविरोधात सातत्याने भूमिका घेणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे.

- Advertisement -

पुण्यातील टिळक रस्त्यावर विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आमच्या गणोशोत्सवाला तू विरोध करतोस, हिंदूंच्या सणाला तू विरोध करतोस, असे म्हणून तरुणांच्या समूहाने त्यांच्यावर हात उचलला. तिथे असलेल्या काही जणांनी तरुणांना मारहाण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु चिडलेल्या तरुणांना विद्यानंद बापटांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली.

विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते. विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

विद्यानंद बापटांच्या मराठीने भल्याभल्यानां फोडला घाम, ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्’ श्लोकाची होतेय चर्चा

हल्ल्यानंतर विद्यानंद बापट काय म्हणाले?
तुम्ही मला विचारत होतात तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. मी म्हणतोय ना, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…चिप प्रसिद्धीसाठी हल्ला केला. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही,याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला.

कोण आहे विद्यानंद बापट?
विद्यानंद बापट हे मूळचे रत्नागिरीचे. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठेत त्यांचे वास्तव आहे. विविध परिवर्तनवादी संघटनांत ते काम करतात. लोकहिताच्या मुद्द्यावर ते प्रामाणिकपणे काम करतात. डीजेबंदी असो वा अंद्धश्रद्धा निर्मूलन, हिरहिरीने ते विविध आंदोलनात सहभागी होतात. धार्मिक सणांच्या नावाखाली होणारे ध्वनी प्रदूषण तसेच रहदारीला होणारा अडथळा या मुद्द्यावर गेली अनेक वर्षे ते लढत आहेत. संघटनात्मक पातळीवर तसेच वैयक्तिक पातळीवरही या मुद्द्याशी संबंधित ते शासकीय अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहेत.

ताज्या बातम्या