Friday, December 13, 2024
Homeक्रीडाआंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनंतर रोईंगपटू दत्तू भोकनळ सरकारविरोधात न्यायालयात जाणार; नेमकं कारण...

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनंतर रोईंगपटू दत्तू भोकनळ सरकारविरोधात न्यायालयात जाणार; नेमकं कारण काय?

नाशिक | Nashik

काही दिवसांपूर्वी सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांची राज्य सरकारने मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करत त्यांना सरकारी नोकरी (Government Job) दिली होती. मात्र, राऊत यांनी ही सरकारी नोकरी नाकारत याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करणारे दत्तू भोकनळ (Dattu Bhokanal) यांनी देखील सरकारविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Kavita Raut : ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत सरकारी नोकरी मिळूनही नाराज; नेमकं कारण काय?

दत्तू भोकनळ यांनी २०१६ च्या ऑलम्पिकमध्ये (Olympics) देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली होती. तर २०१५ मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत सिंगल स्कल प्रकारात दत्तू भोकनळ यांनी रौप्यपदकावर नाव कोरले होते. या स्पर्धेच्या जोरावर त्यांनी खेळाडूंसाठी राखीव असलेल्या थेट नियुक्तीसाठी २०१७ साली राज्य सरकारकडे (State Government) थेट नोकरीसाठी अर्ज केला होता. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्वत: भोकनळ यांच्या नोकरीसाठी पाठपुरावा केला होता. पंरतु, त्यांच्या अर्जाची सरकारने अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा धडाका; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ३८ महत्वाचे निर्णय

तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर (Lalita Babar) यांना एक न्याय आणि इतरांना मात्र दुसरा न्याय दिला जात आहे. या दुजाभावाच्या वागणुकीमुळे राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्राच्या (Uttar Maharashtra) खेळाडूंवर अन्याय होत असल्याचे दत्तू भोकनळ यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याविरोधात न्यायालयात (Court) जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच मागील महिन्यात राज्य सरकारकडून ११६ खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षकपदाची नोकरी देण्यात आली आहे. मात्र, त्यात दत्तू भोकनळ यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.

हे देखील वाचा : Nashik News : ‘लाडकी बहीण’ योजनेचे मनपाकडून ६ हजार अर्ज रद्द

दत्तू भोकनळ कोण आहेत?

दत्तू भोकनळ हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही (Talegaon Rohi) या गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी नौकानयन या क्रीडाप्रकारात भारताचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवत रोईंगमध्ये भारताला अनेक पदके जिंकून दिली आहेत. तसेच त्यांना २०१७ सालचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. तर २०२० मध्ये दत्तू भोकनळ यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

हे देखील वाचा : Political Special : ‘शिवस्वराज्य यात्रा’ कोणत्या उमेदवाराला पावणार?

मी २०१७ साली थेट नियुक्तीसाठी फॉर्म भरला आहे. त्यावेळी ललिता बाबर, कविता राऊत आणि मी नाव नोंदवले होते. यामध्ये ललिता बाबरची नियुक्ती झाली आहे, पंरतु माझी अजूनही नियुक्ती झालेली नाही. २०१७ पासून मी सरकारकडे पाठपुरावा करत असून त्याला अद्यापपर्यंत पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. सरकारकडून नव्या धोरणानुसार नियुक्ती दिली जात आहे, पंरतु मला ती नको असून जुन्या धोरणानुसारच नियुक्ती हवी आहे. त्यामुळे मी सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

दत्तू भोकनळ, रोईंगपटू

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या