Thursday, July 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये लंपास

दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये लंपास

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी Shirvade Vakad

- Advertisement -

निफाड शहरातील उगाव रोड परिसरात जुपिटर गाडीच्या डिक्कीत ठेवलेली दीड लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी निलेश विश्वनाथ निफाडे, वय ३८, व्यवसाय शेती, रा.सोनेवाडी बु. ता. निफाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१७ ऑक्टो रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ते उगाव रोडवरील गीताई कृषी सेवा केंद्रासमोर जुपिटर गाडी उभी करून औषधे खरेदी करण्यास गेले होते. त्यांनी गाडीच्या डिकीत १०० रु किमतीच्या २०० नोटा, २०० रु.च्या १०० नोटा, ५०० रु.च्या २१४ असे रोख १,४७,००० रु रोख रक्कम, कापडी पिशवी, पासबुक आणि दागिने गहाण ठेवल्याची पावतीही डिकीत ठेवलेली होती.

दरम्यान, काही वेळानंतर अज्ञात चोरट्याने गाडीच्या डिक्कीतून रोख रक्कम आणि पिशवी चोरून नेली. या घटनेनंतर निफाड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं.कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि.गणेश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.सांगळे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकीय दबाव झुगारून गुन्हेगारांचा बिमोड करा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असून, गुन्हेगारी टोळ्यांचा कोणताही राजकीय दबाव न घेता कठोरपणे बिमोड करा. कायद्याच्या अंमलबजावणीत कोणीही अडथळा...