Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशदेशात ऑक्टोबरमध्ये 1 लाख कोटींच्यावर GST संकलित

देशात ऑक्टोबरमध्ये 1 लाख कोटींच्यावर GST संकलित

दिल्ली l Delhi

करोनामुळे विसकटलेली देशाची आर्थिक घडी पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे दिसून येत आहे. करोना काळात मागील फेब्रुवारी महिन्यापासून जीएसटी संकलन पहिल्यांदा एक लाख कोटींच्या पुढे गेलं आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर 2020 मध्ये 1,05,155 कोटी रुपये सकल जीएसटी (वस्‍तु आणि सेवा कर) महसूल संकलन झाले ज्यात सीजीएसटी 19,193 कोटी रुपये, एसजीएसटी 25,411 कोटी रुपये, आयजीएसटी 52,540 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित 23,375 कोटी रुपयांसह ) आणि उपकर (सेस) 8,011 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित 932 कोटी रुपयांसह ) समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी 31 ऑक्टोबर , 2020 पर्यंत दाखल करण्यात आलेल्या जीएसटीआर-3बी विवरणपत्रांची एकूण संख्‍या 80 लाख आहे.

सरकारने नियमित निपटारा स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीसाठी 25,091 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 19,427 कोटी रुपये दिले आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये नियमित निपटारा केल्यानंतर केन्‍द्र सरकार आणि राज्‍य सरकारे यांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 44,285 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 44,839 कोटी रुपये आहे..

या महिन्यात मिळालेला जीएसटी महसूल गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत 10 टक्के अधिक आहे. या महिन्यात मालाच्या आयातीतून मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह ) प्राप्त महसूल 11 टक्के अधिक होता. जीएसटी महसुलातील वाढ जुलै , ऑगस्ट आणि सप्टेंबर 2020 च्या तुलनेत अनुक्रमे (-)14, -8 आणि 5 टक्के वाढ नोंदली गेली जी अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि महसुलातील वाढ दर्शवते.

- Advertisment -

ताज्या बातम्या