Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअनपेक्षित सरप्राइज! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती, चर्चांना उधाण

अनपेक्षित सरप्राइज! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती, चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संघाच्या वतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने हजेरी लावलीय. मुंबईतील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून या मान्यवरांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित करणार आहेत.

शनिवारी या व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सुभाष घई, अश्विनी भावे, हेमा मालिनी यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजर होते. मात्र, या सगळ्यांमध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीचा भाईजान म्हणजे सलमान खान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेल्या कार्याला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. केशव बळीराव हेडगेवार यांनी स्थापित केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक जण सहभागी झाले. हिंदू समाजाला संघटित, शिस्तबद्ध आणि बळकट बनवण्याच्या उद्देशाने या संघाची स्थापना करण्यात आली आहे.

Malegaon: मोठी बातमी! मालेगाव महापालिकेत थरारक घटना! पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, नेमके काय घटना घडली?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईमधील नेहरू सेंटरवर भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘नवे क्षितिज’ या नावाने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आज सरसंघचालक मोहन भागवत यांचे व्याख्यान होत आहे. आजपासून पुढचे दोन दिवस व्याख्यानमाला होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.

तर, उद्या त्यांच्यासोबत प्रश्न उत्तरांचे सत्र पार पडेल अशी माहिती आहे. या विशेष कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू यांच्यासह साधारण 900 जणांना आमंत्रण देण्यात आलेय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्यक्रमात अभिनेता सलमान खान, सुभाष घई, अश्विनी भावे, सुनील बर्वे आणि हेमा मालिनी अशा अनेक चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पेट्रोल, डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचा फिटनेसचा प्रश्न गंभीर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar आधीच अमेरिका- इस्त्राईल आणि इराण युध्दामुळे विस्कळीत झालेला इंधनाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 450 ते 500 पैकी जवळपास निम्म्या पेट्रोल,...