Saturday, November 16, 2024
Homeशैक्षणिकग्रामीण विकासात करिअर कराचंय?

ग्रामीण विकासात करिअर कराचंय?

भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार ग्रामीण रोजगार, विकासावर सातत्याने भर देत आहे. ग्रामीण भागात काम करणार्‍या लोकांना प्रोत्साहन देत असून त्यासाठी विविध योजनाही जाहीर करत असते. उदा. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात काम करण्यास कोणीही तयार होत नाही. मात्र त्याठिकाणी नोकरी करणार्‍या व्यक्तीस अन्य कर्मचारी किंवा अधिकार्‍यांच्या तुलनेत अधिक सोयी-सुविधा पुरविल्या जातात.

जेणेकरून गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागात काम करण्यासाठी युवकांना-लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि तो भाग लवकरात लवकर विकासाच्या प्रवाहात दाखल होईल, अशी सरकारची अपेक्षा असते. ज्या विद्यार्थ्यांना, युवकांना ग्रामीण भागात नोकरी किंवा व्यवसाय करणे आवडते त्यांनी ग्रामीण विकासाविषयक अभ्यासक्रमांची निवड करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात नोकरी करताना लोकांचे राहणीमान सुधारणे आणि गावचा विकास करणे या दोन्ही गोष्टी आपण एकाचवेळी साध्य करू शकतो. ग्रामीण विकासाचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना नेहमीच आकर्षित करतात आणि त्यांना ध्येय काय आहे, हे पटवून देत असतात.

- Advertisement -

ग्रामीण भागात राहणार्‍या विविध जाती-धर्मातील समाजाचा विकास कसा पद्धतीने करावा हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून सांगण्यात येते. त्यानुसार आपण अभ्यासक्रमांची निवड केल्यास आपल्याला करियरला चांगला वाव मिळू शकतो. ग्रामीण विकासात काम करण्यासाठी आपल्याला आर्थिक, सामाजिक, लोक प्रशासन, प्रकल्प व्यवस्थापन यासारखे अभ्यासक्रमांची माहिती घेणे गरजेचे आहे. त्याची पदवी प्राप्त केल्यास आपल्याला अनेक क्षेत्रात सहज संधी मिळू शकते. प्रोग्राम प्लॅनिंग, टिचिंग, रिसर्च, पॉलिसी रिसर्च अँड अ‍ॅनालिस, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करियर करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रात शेतकी व्यवसायासाठी रुरल डेव्हलपमेंट ऑङ्गिसर, रुरल इन्ङ्ग्रास्ट्रचर सपोर्ट प्रोग्रँम्स, मायक्रो ङ्गायनान्समध्येही पदवीधारकांना संधी मिळू शकते

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या