Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशRussia-Ukraine War : मोदींचा फोन अन् रशियाकडून सहा तास युद्धविराम

Russia-Ukraine War : मोदींचा फोन अन् रशियाकडून सहा तास युद्धविराम

कीव्ह | Kiev

गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine War) सुरु आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे…

- Advertisement -

याबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. भारत सरकारने रशियासोबत एक महत्वपूर्ण करार केला आहे. खारकीवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने ६ तास युद्ध थांबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक

खारकीव (Kharkiv) परिसरात अडकलेल्या भारतीयांना आजूबाजूच्या देशांच्या सीमेवर सुरक्षितपणे नेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, खारकीव या शहरात अजूनही हजारो भारतीय अडकलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली.

विधानभवनाबाहेर शीर्षासन करणारे ‘ते’ आमदार कोण?

या चर्चेत पंतप्रधान मोदींनी भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा मुद्दा मांडला. यावेळी पुतीन यांनी रशिया सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे आश्वासन दिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या