त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन स्तरावर कुंभमेळा शिखर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत साधुमंतांना घेतले नाही, यामुळे त्र्यंबकला साधुहमंहतांनी बैठक घेऊन समितीच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.
साधु,महंतांचे कुंभमेळा भरवण्याच्या नियोजनात सदस्यत्व नसल्याने त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करीत आग पाखड केली आहे. शैव , वैष्णव अशा तेरा आखाडाच्या साधूनी माध्यम प्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त करताना म्हटले की, याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे.
त्र्यंबकेश्वरचे श्रीमंहंत शंकरानंद सरस्वती महाराज नाशिकचे महंत भक्त चरणदास महाराज यांनी या संदर्भात मीडियाला प्रतिक्रिया दिली. त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांचे प्रमुख महंत प्रतिनिधी उपस्थित होते. आनंद आखाड्याचे रामानंद रामानंद सरस्वती निरंजनी आखाड्याचे महंत धनंजयगिरी महाराज, नया उदासी आखाड्याचे महंत गोपालदास. बडा उदासीन आखाड्याचे महंत दानमुनि, सिताराम बाबा आश्रमाचे महंत , अन्नपूर्णा आश्रमाचे महंत, श्रीराम शक्ती पिठाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज तसेच इतर आखाड्याचे साधू महंत उपस्थित होते.





