Tuesday, February 3, 2026
Homeराजकीय…तर मुलीचे पाय तोडा; प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान

…तर मुलीचे पाय तोडा; प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान

दिल्ली । Delhi

भाजपच्या (BJP) भोपाळमधील (Bhopal) माजी खासदार आणि वादग्रस्त नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) पुन्हा एकदा त्यांच्या अतिशय आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमादरम्यान पालकांना उद्देशून त्यांनी केलेले धक्कादायक विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यावरून आता नवा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पालकांना उद्देशून केलेल्या वक्तव्यातून तीव्र भावना आणि कठोरता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, “जर तुमची मुलगी तुमचे ऐकत नसेल, एखाद्या विधर्मीसोबत जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर तिचे पाय तोडा.” त्यांनी पुढे म्हटले, “जर आमची मुलगी आमची आज्ञा मोडत असेल, जर तिने बिगर हिंदू घरी जाण्याचा प्रयत्न केला, तर आपण कोणतेही प्रयत्न सोडू नयेत. अगदी तिचे पायही तोडावे. कारण जे आपल्या परंपरा आणि शिकवणींचे उल्लंघन करतात, त्यांना फटकारलेच पाहिजे.” प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पालकांना मुलांच्या संगोपनाबाबत सल्ला देताना कठोर भूमिका घेण्यास सांगितले. “तुमच्या मुलाच्या कल्याणासाठी, तुम्हाला त्यांना मारहाण करावी लागली तरी मागे हटू नका. जेव्हा पालक शिक्षा करतात, तेव्हा ते त्यांच्या चांगल्या भविष्यासाठीच असे करतात,” असे त्यांचे मत आहे.

YouTube video player

मुलींच्या जन्म आणि संगोपनाबद्दल बोलताना त्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली. “जेव्हा मुलगी जन्माला येते, तेव्हा आई-वडील तिला लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप मानतात. पण, तीच मुलगी मोठी झाल्यावर ‘विधर्मी बनण्याचा’ विचार करू लागते. अशा मुलींवर पालकांनी बारीक लक्ष ठेवले पाहिजे. जर त्या संस्कार मानत नसतील, घरातून पळून जाण्याचा विचार करत असतील, तर पालकांनी सतर्क रहावे. अशा मुलींना मारून, झोडून प्रेमाने समजावून थांबवा आणि त्यांना घराबाहेर पडू देऊ नका,” असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. याआधी एका कार्यक्रमात, त्यांनी मंचावरून सांगितले होते की, बिगर हिंदू लोक मंदिराबाहेर प्रसाद विकताना दिसल्यास त्यांना मारहाण करावी आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी त्यांना धडा शिकवावा. त्याचबरोबर, प्रत्येक घरात धारदार शस्त्रे उपलब्ध असली पाहिजेत, जेणेकरून गरज पडल्यास त्यांचा वापर करता येईल, असेही विधान त्यांनी केले होते.

प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या ताज्या विधानामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विरोधी पक्षांकडून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Mira Bhayandar Election : मिरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर; मराठी एकीकरण समिती आक्रमक

0
मुंबई । Mumbai मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर आज या पेचावर पडदा पडला असून भारतीय जनता पक्षाच्या डिंपल...