Sunday, June 14, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत उद्यापासून श्रीरामनवमी उत्सवाचा सोहळा

Shirdi : शिर्डीत उद्यापासून श्रीरामनवमी उत्सवाचा सोहळा

2 लाख भाविकांची मांदियाळी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साईंच्या नगरीत चैतन्याचा सोहळा अवतरणार आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने बुधवार 25 मार्च ते शुक्रवार, 27 मार्च 2026 या कालावधीत 115 वा श्रीरामनवमी उत्सव अत्यंत दिमाखात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 2 लाखांहून अधिक साईभक्तांच्या आगमनाची शक्यता असून संस्थानच्या वतीने 1 लाख 66 हजारांहून अधिक सभासदांना निमंत्रण पत्रिका धाडण्यात आल्या आहेत. भाविकांचे ऊन आणि गर्दीपासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिर परिसरात 75 हजार चौरस फुटांचे भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

- Advertisement -

यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुंबईच्या द्वारकामाई मंडळाच्या वतीने साकारला जाणारा साई मयूरद्वार देखावा आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई असणार आहे. बंगळुरूचे दानशूर भक्त व्यंकटा सुब्रमण्यन यांच्या वतीने मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली जाणार आहे. उत्सवाच्या तीनही दिवसांत देशपातळीवरील नामांकित कलाकारांचे कार्यक्रम होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध संगीतकार आनंद-मिलींद, पार्श्वगायिका अनुपमा देशपांडे आणि विक्रम नांदेडकर यांच्या कीर्तनाचा समावेश आहे. मुख्य दिवशी म्हणजेच 26 मार्च रोजी भाविकांसाठी समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार आहे.

पदयात्रींसाठी ग्रीन कॉरिडॉर आणि वैद्यकीय सुविधा पालखी सोहळ्यासाठी येणार्‍या पदयात्रींची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई ते शिर्डी महामार्गावर 10 विविध ठिकाणी 1 लाख 12 हजार चौरस फुटांचे विस्तीर्ण मंडप उभारले आहेत. सिन्नर ते शिर्डी या मार्गावर संस्थानचे फिरते वैद्यकीय पथक तैनात असेल. कोपरगावच्या कातकडे बंधूंकडून 10 पाण्याचे टँकर विनामूल्य पुरवण्यात आले आहेत. दर्शनाची रांग, भक्तनिवास आणि प्रसादालय या सर्व ठिकाणी अतिरिक्त बसेस आणि प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

चोख सुरक्षा आणि शिस्तबद्ध नियोजन उत्सवाच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन, शीघ्र कृती दल आणि बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे. भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि अतिक्रमणे रोखण्यासाठी विशेष ‘सिव्हिल सुरक्षा’ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. संस्थानचे तदर्थ समिती अध्यक्ष शिवाजीराव कचरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कर्मचारी हा भक्तीचा कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...