राहाता |प्रतिनिधी| Rahata
शिर्डी (Shirdi) येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांना (Devotee) कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे पिस्तुलाचा धाक (Pistol Fear) दाखवून सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल जबरदस्तीने लुटणारी टोळी (Robbers Gang) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) जेरबंद केली असून त्यांच्याकडून 9 लाख 64 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. 7 आरोपींना जेरबंद केले असून पोलीस चौकशीत या टोळीने केलेले दरोड्याचे 4 गुन्हेही उघडकीस आले आहेत.
16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास मोहित महेश पाटील, रा. दिंडोली, ता. चौरीयासी, जि. सुरत, गुजरात हे कारने प्रवास करत असताना अज्ञात आरोपींनी त्यांना इर्टिगा कारने आडवले. त्यांना गन, गुप्ती व कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व मोबाईल असा मुद्देमाल जबरदस्तीने लुटला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargav Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पो.नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला व गुप्त माहितीच्या आधारे 19 फेब्रुवारी 2025 रोजी संशयित आरोपींना कारवाडी येथे सापळा रचून अटक (Arrested) करण्यात आली.
यात आरोपी सिद्धार्थ भाऊसाहेब कदम, राहुल संजय शिंगाडे, सागर दिनकर भालेराव, समीर रामदास माळी, दोन अल्पवयीन आरोपी सर्व पोहेगाव येथील रहिवासी असून विजय गणपत जाधव हा श्रीरामपूर येथील आहे. या आरोपींकडून 9 लाख रूपये किंमतीची पांढर्या रंगाची इर्टिगा कार (एमएच-41-व्ही-2817), 45 हजार रूपये किंमतीचे 3 मोबाईल, 11 हजार रूपये किंमतीच्या 2 एअरगन्स, 3 हजार रूपये किंमतीचे 3 लोखंडी कत्ती, 1 हजार रूपये किंमतीच्या एअरगण छर्या, 4 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या व चैन असा एकूण 9 लाख 64 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
तपासादरम्यान आरोपींनी संगमनेर, घोटी (जि. नाशिक) आणि वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्याची अधिक चौकशी सुरू असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola), अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली. यामध्ये सपोनि हेमंत थोरात व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, रमिजराजा आत्तार, रोहित येमुल, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांचा समावेश होता.