Friday, October 23, 2026
HomeनगरShirdi : आग्रा येथील साईभक्ताकडून 1.33 कोटीचा नंदी अर्पण

Shirdi : आग्रा येथील साईभक्ताकडून 1.33 कोटीचा नंदी अर्पण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील साईभक्तांकडून 54 किलो 65 ग्रॅम चांदीचा नंदी व बेस 98 ग्रॅम 600 मिलीग्रॅम सोन्याचे शिंग व बिंदी साईचरणी देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आली असून या नंदीची किंमत जवळपास 1 कोटी 33 लाख आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशातील आग्रा येथील साईभक्तांकडून साईबाबांच्या चरणी 54 किलो 65 ग्रॅम वजनाचा चांदीचा नंदी व बेस तसेच 98 ग्रॅम 600 मिलीग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोन्याचे शिंग व बिंदी अशी देणगी प्राप्त झाल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. साईबाबा समाधी मंदिरातील श्रींच्या मूर्तीसमोरील जुन्या नंदीचे विधिवत उत्तरपूजन करून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्याने अर्पण करण्यात आलेल्या नंदीची धार्मिक विधीपूर्वक प्रतिष्ठापना अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

- Advertisement -

चांदीच्या नंदीचे वजन 27 किलो 27 ग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य 60 लाख 27 हजार 21 इतके आहे. तसेच नंदीसाठी अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या बेसचे वजन 27 किलो 38 ग्रॅम असून त्याचे देणगीमूल्य 60 लाख 29 हजार 474 आहे. चांदीचा नंदी व बेस यांचे एकूण वजन 54 किलो 65 ग्रॅम असून एकूण देणगी मूल्य 1 कोटी 20 लाख 56 हजार 495 इतके आहे. या चांदीच्या नंदीला विशेष धार्मिक व अलंकारिक स्वरूप देण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचे शिंग कव्हर व सोन्याची बिंदी देखील अर्पण करण्यात आली. सोन्याच्या शिंगाचे वजन 69 ग्रॅम 300 मिलीग्रॅम तर सोन्याच्या बिंदीचे वजन 29 ग्रॅम 300 मिलीग्रॅम असून दोन्ही अलंकारांचे एकूण वजन 98 ग्रॅम 600 मिलीग्रॅम आहे. या सोन्याच्या अलंकारांचे एकूण देणगीमूल्य 13 लाख 85 हजार 132 इतके आहे.

या साईभक्तांनी यापूर्वीही साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपातील सोन्या-चांदीच्या वस्तू श्रद्धापूर्वक अर्पण केल्या आहेत. साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून सातत्याने करण्यात येणारे त्यांचे हे योगदान साईभक्तीची समृद्ध परंपरा अधोरेखित करणारे आहे. साईभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या या अमूल्य दानातून साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या संदेशाची अनुभूती अधिक दृढ होत असून भक्ती, समर्पण आणि सेवाभावाची ही परंपरा अखंड सुरू आहे. साईभक्तांच्या विनंतीवरून त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

ताज्या बातम्या

Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भावाच्या संसारातील अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून जवळीक साधल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला...