Sunday, February 9, 2025
Homeनगरसाई संस्थानने कर्मचार्‍यांच्या कामाचा वेळा बदलल्या

साई संस्थानने कर्मचार्‍यांच्या कामाचा वेळा बदलल्या

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साई संस्थानातील कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानने घेतला आहे. संस्थानातील कर्मचार्‍यांची पहाटे चार वाजता ड्युटी सुरू व्हायची, ती आता सकाळी सहा वाजता सुरू होईल. शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानने हे मोठे पाऊल उचलले आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी कर्मचार्‍यांच्या कामकाजाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आजपासूनच यावर अंमलबजावणी सुरू झाली.

- Advertisement -

बरेच कर्मचारी बाहेरगावातून येतात. त्यांची रात्री जाण्या-येण्याची सुरक्षितता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, पहिली शिफ्ट सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि तिसरी शिफ्ट रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असेल. जनरल शिफ्ट सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. मंदिरातील आरती पहाटे असल्याने पुजारी व संबंधित कर्मचार्‍यांच्या वेळेत बदल होणार नाही. याशिवाय प्रसादालय, शैक्षणिक संस्था यांच्या वेळा पूर्वीप्रमाणे राहतील असे संस्थानने काढलेल्या परीपत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या