मुंबई | Mumbai
बॉलिवुड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. पण, सैफ या प्राणघातक हल्ल्यातून बचावला. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला रविवारी मध्यरात्री ठाण्यातून पकडण्यात आले. मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहझाद असे या हल्लेखोराचे नाव असून चे वय ३० वर्षे आहे. पोलिसांनी अनेक खुलासे केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, सैफवर हल्ला केल्यानंतर कसा निसटला याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी अनेक गुपिते उघड केली आहेत. तो सैफच्या घरात कुठून आणि कसा घुसला हे पोलिसांनी सांगितले आहे. चाकू हल्ल्यानंतर तो कोणत्या मार्गाने पळून गेला हेही सांगण्यात आले आहे.
पटवर्धन गार्डनमध्ये झोपला
पोलिसांनी सांगितले की, तो १६ जानेवारीच्या पहाटे वांद्रे येथील ‘सतगुरु शरण’ इमारतीत असलेल्या बॉलिवूड स्टारच्या फ्लॅटमध्ये चोरीच्या उद्देशाने घुसला होता. ‘घटनेनंतर १६ जानेवारीला सकाळी ७ वाजेपर्यंत तो वांद्रे पश्चिम येथील पटवर्धन गार्डनजवळील बस स्टॉपवर झोपला होता. नंतर ट्रेनमध्ये बसून वरळी गाठले.”
इमारतीत दोन भिंतींच्यामध्ये पाईपलाईनची जागा असते. त्या पाईपलाईनने तो सहाव्या ते १२ व्या मजल्यापर्यंत चढून गेला. “आमच्या चौकशीनुसार तो सातव्या-आठव्या मजल्यापर्यंत जिन्याने चढून वर गेला. तिथून डक्ट एरियात गेला. तिथून पाईपलाइवरुन चढून सैफच्या घरात प्रवेश केला. बाथरुमच्या खिडकीतून तो आत शिरला. फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो बाथरूममधून बाहेर आला, जिथे त्याला घरातील कर्मचाऱ्यांनी पाहिले. यानंतर, घटना सुरू झाल्या ज्याचे रुपांतर हल्ल्यात झाले.”
सैफच्या स्टाफकडे १ कोटीची खंडणी मागितली
हल्लेखोराने सैफच्या स्टाफकडे त्याने १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. नंतर सैफ बरोबर झालेल्या झटापटीत चाकूने त्याच्यावर हल्ला केला. सैफ अली खानने त्याला फ्लॅटमध्ये बंद केले होते. पण तो खिडकीद्वारे बाहेर निघण्यात यशस्वी ठरला. पोलिसांना त्याच्या बॅगेमध्ये काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी सांगितले की, “आरोपीला हे माहित नव्हते की, तो सैफ अली खानच्या घरात आला आहे. टीव्ही चॅनल पाहिल्यानंतर त्याला समजले की, त्याने ज्याच्यावर हल्ला केला, तो बॉलिवूडचा मोठा स्टार आहे”.
दरम्यान, दुसऱ्या अधिकाऱ्यांनी दावा केला की शहजादला पळून जाण्यासाठी वेळ मिळाला कारण वांद्रे पोलिस स्टेशनच्या एका तपास अधिकाऱ्याने खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) काढून घेतला आणि तो मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला गेला नाही.
कोण आहे आरोपी?
मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला ठाण्यातून अटक करण्यात आली. आरोपी बांगलादेशी नागरिक असून त्याने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर त्याचे नाव बदलून बिजॉय दास असे ठेवले.
पोलिसांनी सांगितले की शहजाद हा दक्षिण बांगलादेशातील झालोकथी, ज्याला झालाकाथी म्हणून ओळखले जाते, येथील आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो मुंबईत असून यादरम्यान त्याने ‘हाउसकीपिंग एजेन्सी’सह अनेक ठिकाणी छोटी-मोठी नोकरी केल्याचे आरोपीने सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा