Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSaif Ali Khan: डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेता सैफ अली खानची पहिली झलक; डॉक्टरांनी...

Saif Ali Khan: डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेता सैफ अली खानची पहिली झलक; डॉक्टरांनी दिला हा सल्ला

मुंबई | Mumbai
अभिनेता सैफ अली खानवर मागच्या गुरुवारी जीवघेणा हल्ला झाला होता. आज मंगळवारी सैफला डिस्चार्ज मिळाला आहे. तो रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्याची पहिली झलक समोर आलीय. 16 जानेवारी रोजी मध्यरात्री त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या हल्ल्यानंतरचा सैफचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार चालू होते. या रुग्णालयात त्याच्यावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर आता सहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो निळी जिन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये आला. त्याच्यावर चाकूचे एकूण सहा वार करण्यात आले होते. आज त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर लगेच त्याच्या खासगी कारमध्ये बसून तो त्याच्या राहत्या घरी गेला.

- Advertisement -

सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानचे फोटो समोर आले आहे. रुग्णालयातू बाहेर पडताना त्याची झलक मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. १६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानच्या राहत्या घरी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख मुंबई पोलिसांनी पटवली आहे. हल्लेखोराचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असून तो बांगलादेशचा रहिवासी आहे. सध्या शरीफुल पोलिस कोठडीत आहे आणि त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. चौकशीत आरोपीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. शरीफुल भारतात ओळखपत्र तयार करण्यासाठी चोरी करण्याचा विचार करत होता. मात्र नंतर त्याने आपला विचार बदलला. आरोपीने असेही सांगितले की, चोरी करून मोठी रक्कम मिळाल्यास तो बांगलादेशला परत जाण्याचा विचार करत होता.

डॉक्टरांनी दिला सल्ला
सैफ अली खानला सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला असला तरी त्याच्या जखमा अद्याप ताज्याच आहेत. या जखमा भरून निघण्यासाठी त्याला पुढचे काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी त्याला काही सल्ले दिले आहेत. यात सर्वप्रथम सैफ अली खानला एक महिना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच त्याला पुढचे काही दिवस जीममध्ये व्यायाम करता येणार नाही. यासह प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत त्याला चित्रपटांच्या शूटिंगसाठीही जाता येणार नाही. यासह त्याला कोणतीही जड वस्तू उचलता येणार नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या