Friday, May 3, 2024
Homeधुळेपोलीस निरीक्षकांसह कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

पोलीस निरीक्षकांसह कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

साक्री – Sakri – प्रतिनिधी :

लाऊडस्पिकरचा आवाज कमी करण्यासाठी सांगण्यास गेलेल्या पोलिस निरीक्षकांसह पोलीस कर्मचार्‍यांना…..

- Advertisement -

धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका महिलेसह 11 जणांवर साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री येथील वंजार गल्लीत मोठा जमाव जमल्याने पांगवण्यासाठी गेलेल्या इतर पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार घडला त्या गणेश मंडळाकडे गणपती बसविण्याची साधी परवानगी देखील नसल्याचे पोलीसांनी सांगितले.

दि.1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासुन गणपती विसर्जन बंदोबस्तासाठी पोनि नितीन देशमुख, पोहेकॉ महेश जाधव, पो.कॉ.रोहन वाघ,पो.कॉ.विशाल परदेशी साक्री शहरात पेट्रोलिंग करत असतांना सकाळी 10:30 वाजता बसस्थानककडून पोळा चौकाकडे जात असताना वंजार गल्ली येथे स्पिकरचा मोठ्याप्रमाणात आवाज येत असल्याने त्या ठिकाणी जावुन तेथे उभ्या असलेल्या व्यक्तीला त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रोहित विवेक पाटील आणि पंकज संजय असे सांगितले.

स्पिकरची परवानगी नसताना तुम्ही स्पिकर मोठा आवाज करुन का वाजत आहे ? असे विचारल्यावरुन त्यांनी अहिरे यांच्याशी वाद घालुन शासकीय गणवेश फाडुन नुकसान केले व जगदीश अहिरे यांच्या पोटात लाथ मारुन शिविगाळ केली.

पो.नि.देशमुख हे संबंंधितांंना समजवत असताना रोहित विवेक पाटील याने पोलिस निरीक्षक देशमुख यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली.

पो.हे.कॉ.महेश जाधव,पोकॉ.रोहन वाघ, पो.कॉ.परदेशी हे रोहित पाटील याला पोलीस वाहनात बसवत असताना भावड्या उर्फ संदिप भामरे, आकाश मारवाडी,कुणाल मराठे व रोहित पाटील यांचा काकाचा मुलगा, सागर मांदळे, रोशन जैन, रोहित पाटील यांची आई, भद्रा उर्फ दादु पाटील,चंद्रशेखर यांनी तोंडाला मास्क न लावता त्यांनी पोलिसांशी वाद घालुन धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळावरू रोहित विवेक पाटील, पंकज संजय शिल्लक, भावड्या उर्फ संदिप भामरे, रोशन जैन यांना ताब्यात घेण्यात आले

- Advertisment -

ताज्या बातम्या