Friday, May 3, 2024
Homeनगरसाकुरी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

साकुरी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील साकुरी येथील साकुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली.

- Advertisement -

गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष दिवंगत भानुदास दंडवते यांच्या अशिर्वादाने व कारखान्याचे विद्यमान संचालक अशोकराव दंडवते यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यातील अग्रगण्य सोसायटी म्हणून ओळखली जाणारी ही संस्था बिनविरोध झाली आहे. या संस्थेला 105 वर्षांची परंपरा आहे. संचालक मंडळाच्या सर्वसाधारण कर्जदार मंतदार संघातून अशोकराव दामोधर दंडवते, सुधाकर दादासाहेब दंडवते, वैशाली विजय दंडवते, आशेकराव रामभाऊ बावके, ज्ञानेश्वर शिवराम बावके, रंगनाथ जनार्दन दंडवते, अनिल लक्ष्मण बनसोडे, संजय प्रभाकर कुलकर्णी, महिला राखीवमधुन राधिका शामराव दंडवते, रंजना प्रभाकर बावके, इतर मागास प्रवर्गमधून संतोष कृष्णराव दंडवते, अनुसूचित जाती-जमाती मधुन दगडू आनंदगीर गोसावी, असे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. गेली निवडणूकही बिनविरोध पार पडली होती.

यावेळी गणेशचे संचालक तथा सोसायटीचे नूतन संचालक अशोकराव दंडवते म्हणाले, या निवडणुकीत 25 इच्छुक उमेद्वारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 12 जणांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपली उमेद्वारी अर्ज मागे घेतले. आम्ही त्यांना धन्यवाद देत आहोत.

संस्थेची निवणूक बिनविरोध होणे कामी सर्वश्री आप्पासाहेब दंडवते, प्रल्हादराव दंडवते, उध्दव दंडवते, सरपंच राजेंद्र दंडवते, मधुभाऊ दंडवते, प्रशांत दंडवते, जयराज दंडवते, वाल्मिक बावके, भास्कर बावके, राजेंद्र बावके, बबनराव बनसोडे, प्रदिप बनसोडे, वैभव कुलकर्णी, भाऊसाहेब शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी काम पाहिले. त्यांना सचिव सतीश महाले, दाभाडे, सहसचिव सखाराम माळवदे यांनी सहकार्य केले. आ. राधाकृष्ण विखे पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या