Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीरामपूर-राहुरी 32 गावांतर्गत पाच ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी निधी मंजूर- आ. कानडे

श्रीरामपूर-राहुरी 32 गावांतर्गत पाच ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी निधी मंजूर- आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीरामपूर तसेच राहुरी 32 गावांतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी तात्विक मान्यता प्राप्त झाली आहे. श्रीरामपूर-राहुरी 32 गावांतर्गत पाच ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. कानडे यांनी दिली.

- Advertisement -

मतदार संघातील इमारतींसाठी निधी मिळावा यासाठी ग्रामपंचायतींनी आमदार लहू कानडे यांच्याकडे मागणी केल्यानुसार मतदारसंघातील ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते, त्यानुसार श्रीरामपूर मध्ये खानापूर, मातुलठाण व राहुरी 32 गावांतर्गत वांजुळपोई, संक्रापूर व कोल्हार खुर्द या पाच ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी तात्वीक मान्यता प्रदान झाल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

सदर प्रस्तुत यादीतील नमूद ग्रामपंचायतींबाबत निकषानुसार विहित नमुन्यातील माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबतही आ. लहू कानडे यांनी सांगितले. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयास इमारत स्वत:ची आहे किंवा कसे, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामास पुरेशी जागा उपलब्ध आहे किंवा कसे व सदर जागेवर इमारत बांधकामास इतर कायदेशीर अडचणी नाहीत, सदर ग्रामपंचायतीस अन्य योजनेतून निधी उपलब्ध नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जसे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान इ. योजनेतून कार्यालय बांधकामास मंजुरी देण्यात आलेली किंवा कसे इ. बाबत सविस्तर अहवाल संबंधित विभागाकडून मागविण्यात आलेला आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत कार्यालयांसाठी निधी मिळावा म्हणून आपण ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार उक्त ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी निधी उपलब्ध झाला असून लवकरच सदर ग्रामपंचायतींच्या सुसज्ज इमारती उभ्या राहतील, अशी ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या