Thursday, May 2, 2024
Homeनगरवाळू माफियांचा महसुल पथकावर हल्ला

वाळू माफियांचा महसुल पथकावर हल्ला

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील मिरजगाव (Mirajgav) परिसरामध्ये गौण खनिज (Minor Mineral) प्रतिबंधक पथकाने वाळूचा डंपर (Sand Dumper) अडवला असता मुजोर वाळू माफियांनी (Sand Mafia) गावकामगार तलाठी (Talathi) यांना शिवीगाळ करून मारहाण (Beating) केली. तसेच वाळूने भरलेला डंपर पळवून नेला. याप्रकरणी सात जणांवर मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये (Mirajgav Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सर्व्हरच्या समस्येमुळे सौरपंप अर्ज भरताना शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड

दत्ता दळवी, नितीन बेद्रे, विजय कोरडे (सर्व रा. तिखी, ता. कर्जत, आकाश पाटील (रा. वाकी ता. कर्जत), भैय्या कर्डिले (रा. शिराळ, जि. बीड) व आणखी अनोळखी दोघेजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा महसूल विभागाने (Revenue Department) तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात कामगार तलाठी अनिरुद्ध रमेश खेतमाळीस यांनी कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरामध्ये शुक्रवारी (दि.19) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारा महसूल विभागाचे भरारी पथक गस्त घालत असताना त्यांना चांदे गावाकडून घोगरगाव कोंभळी रस्त्याने रवळगाव फाटा येथे विना नंबर डंपर वाळू वाहतूक करत असताना आढळून आला.

मनपात अधिकार्‍यांची मनमानी

यानंतर त्याला तहसील कार्यालय कर्जत (Tahsil Office Karjat) येथे डंपर घेण्यास सांगितले असता ड्रायव्हर दत्ता दळवी याने डंपर पळवून नेला. यानंतर कामगार तलाठी अनिरुद्ध खेतमाळस व आणखी एक जण यांनी दुचाकीवरून डंपरचा पाठलाग करून त्याला गाठले. तोपर्यंत ड्रायव्हर दत्ता दळवी त्यांनी फोन करून इतर साथीदारांना बोलवून घेतले होते. डंपर थांबवताच ते सर्वजण त्या ठिकाणी आले व त्यांनी कामगार तलाठी अनिरुद्ध खेतमाळ यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली व जिवे मारण्याची धमकी (Threat) देऊन डंपर पळून नेला.

मोबाईलवर बोलण्याच्या नादात नेवाशाचे तहसीलदार पाण्यात पडले!

कामगार तलाठी अनिरुद्ध खेतमाळ यांच्यावर झालेला हाल्ल्याची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित व्यक्तींंवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्या शेतजमिनीवर व स्थावर मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे. तसेच या परिसरामध्ये सुरू असलेला अवैद्य वाळू उपसा बंद करण्यासाठी आणखी कारवाया तीव्र करणार आहोत.

– गणेश जगदाळे, तहसीलदार, कर्जत

- Advertisment -

ताज्या बातम्या