Thursday, May 2, 2024
Homeनगरआंबी दुमाला तलाठी कार्यालय ८ वर्षांपासून बंद

आंबी दुमाला तलाठी कार्यालय ८ वर्षांपासून बंद

संगमनेर (प्रतिनिधी)

तालुक्यातील आंबी दुमाला (Aambi Dumala) येथील तलाठी कार्यालय (Talathi Office) आठ वर्षांपासून बंद असल्याच्या गंभीर घटनेकडे तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सरकारचे लक्ष वेधले. हे कार्यालय नियमितपणे सुरू होईल आणि या भागातून गौण खनिजाच्या होत असलेल्या उत्खननाची चौकशी करण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले.

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) आ. विखे पाटील यांनी आंबी दुमाला तलाठी कार्यालय ८ वर्षांपासून बंद असल्याने या भागातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या गावातील सर्व ग्रामस्थांना बोटा तलाठी कार्यालयात कामासाठी जावे लागते. विशेष म्हणजे या तलाठी कार्यालयास वीजपुरवठा नसल्याने संगणकासह कोणतीच सुविधा नाही असे या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठ्याने सांगितल्याची बाब आ. विखे पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. आंबी दुमाला तलाठी कार्यालयात २०१३ साला पासून ते कालपर्यंत कायमस्वरुपी तलाठीच काम पाहण्यासाठी नेमला गेलेला नाही. अतिरिक्त पदभारावरच या कार्यालयाचा पदभार सुरू असल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली.

प्रारंभी महसूल विभागाचे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी या गावात तलाठी पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या ठिकाणच्या तलाठ्याकडे देण्यात आला होता मात्र आता एस. बी. वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र उत्तराने समाधान न झाल्यामुळे आ. विखे पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका मांडून तलाठीच जागेवर नसल्याने ग्रामस्थांना बोटा कार्यालयात जाऊन कागदपत्र मिळावावे लागतात, महसूल मंत्र्यांचा तालुका असल्याने हे सर्व माफ आहे का असा संतप्त सवाल त्यांनी केला. गौण खनिज वाहतुकीबाबत चौकशी करू असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगताच, स्वतंत्र चौकशीची गरज नाही, कारवाई करा अशी जोरदार मागणी आ. विखे पाटील यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आ. विखे पाटील यांनी आंबी दुमाला तलाठी कार्यालयाचा विषय उपस्थित केल्यानंतर महसूल प्रशासन तडकाफडकी जागे झाले. तातडीने पुर्वीच्या तलाठी श्रीमती एस.बी वाकचौरे यांना पुन्हा याच पदावर नियुक्त केल्याचा आदेश प्रांताधिकारी मंगरुळे यांनी काढला. विशेष म्हणजे श्रीमती एस.बी वाकचौरे यांनी याच तलाठी कार्यालयातून वैद्यकीय कारणाने आपली सेवा अकोले तालुक्यात वर्ग केली होती. त्यांनाच पुन्हा आता या तलाठी कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या