Monday, October 26, 2026
Homeक्राईमCrime News : संगमनेरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

Crime News : संगमनेरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

15.20 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील कासारवाडी-खांडगाव येथील प्रवरा नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.24) कारवाई केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, टिप्पर आणि वाळू असा एकूण 15 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव, दीपक जाधव, विशाल तनपुरे, बाळासाहेब गुंजाळ आणि अजिनाथ पाखरे यांचे पथक तयार केले होते. शनिवारी हे पथक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, अमोल जोंधळे व त्याचे साथीदार कासारवाडी-खांडगाव येथील प्रवरा नदीपुलाखाली नदीपात्रातून विनापरवाना टिप्परमध्ये वाळू भरून वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता, काही जण नदीपात्रातून टिप्परमध्ये वाळू भरताना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.

यामध्ये सनी संजय चव्हाण (वय 19, रा. साईखिंडी फाटा, डी मार्टशेजारी, संगमनेर) आणि अमोल संजय जोंधळे (वय 27, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून टिप्पर (क्र .एमएच.17, सीव्ही.3430) आणि वाळू असा एकूण 15 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘चला शाळेत जाऊ’ अभियानामुळे फुटणार बोगस पटसंख्येचा फुगा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शिक्षकांची पदे टिकविण्यासाठी पटसंख्या फुगविण्याचे प्रकार आता उघड होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या ‘चला शाळेत जाऊ’ अभियानांतर्गत...